सईद खान प्रस्तुत एक शाम रफी के नाम मैफिलीने मोहंमद रफी यांना अभिवादन

अहमदनगर- शब्द हे फार काही करु शकते. कवींनी लिहिलेल्या गीतांमुळे माणसाला आकाशात असल्याचे भासावून जाऊ शकते. तर त्याच शद्बांनी माणसाची निचांकी ही होते. अशाच या कवींनी लिहिलेल्या गीतांना जोपर्यंत सुरांची साथ मिळत नाही तो पर्यंत ते रसिकांना आवडत नाही. या कार्यात सुरांच्या माध्यमातून शब्दांना सौंदर्य देण्यात मोहंमद रफि यांचा हातखंडा होता, असे प्रतिपादन संगीतप्रेमी व रफी प्रेमी सईद खान यांनी केले.
मोहम्मद रफी प्रेमी सईद खान यांच्यावतीने स्व.मोहंमद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘एक शाम रफी के नाम’चे रहमत सुलतान सभागृहात आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तीर्ण होणारे युवराज गांधी (सी.ए.),प्रज्ञा गांधी (सी.ए.)सानिया असलम शेख (बीसीए) या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी के के खान, बीएसएनएलचे निवृत्त कर्मचारी कलीम शेख, शायर रशीद कुरेशी, करीमभाई  हुंडेकरी,संजय भिंगारदीवे,मतिन भाई (चांद बेकरी),निलेश चोपडा आदी मान्यवरांनी सहकार्य केले.
प्रारंभी मोहंमद रफी यांना अभिवादन करण्यात आले. 
पुढे बोलतांना सईद खान म्हणाले की, आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोर गीतकारांच्या जयंती व पुण्यतिथीच्या माध्यमातून होणार्‍या या गायनाच्या कार्यक्रमातून नवीन कलाकारांना संधी प्राप्त होत आहे. अशाच कार्यक्रमांद्वारे छोटे कलाकार टी.व्ही. व सिनेमात सुद्धा पोहचत असून, कलाकारांना रोजगार प्राप्त होत असल्याचे सांगितले.
या श्रद्धांजली कार्यक्रमात सईद खान, अन्वर शेख, आबीद हुसेन,अंजुम पटवेकर,अन्सार शेख, संजय भिंगारदिवे,मुख्तार शेख,विद्या तन्वर, योगिनी अक्कडकर यांनी मोहम्मद रफीच्या सदाबहार एकापेक्षा एक नावाजलेली गीते सादर करून उपस्थित संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. वाह वाह... क्या खूब है... बहुत बढीया अशा दादने रसिक वर्ग प्रत्येक गायकाला प्रोत्साहित करत होते. कार्यक्रमास मोहम्मद रफी प्रेमी व संगीतप्रेमींनी रहमत सुलतान हॉल खचाखच भरलेले होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन समीर खान यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा