नगर -रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्यावतीने पर्यावरण संवर्धना साठी भव्य उपक्रम राबविण्यात आला. १ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सीक्यूएव्ही (सेंट्रल क्वालिटी अॅश्युरन्स-व्हेईकल्स) अहिल्यानगर येथे तब्बल ५००० सीताफळाची रोपे लावण्यात आली.
या प्रकल्पाचे उद्घाटन सीक्यूएव्हीचे प्रमुख ब्रिगेडियर राजीव चावला सर यांच्या हस्ते झाले. १२५ एकर विस्तीर्ण परिसरात केलेले हे वृक्षारोपण खरोखरच एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. आपल्या मनोगतात ब्रिगेडियर श्री. चावला यांनी वृक्षलागवडीचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले. व या उपक्रमामुळे येणाऱ्या काळात सकारात्मक परिणाम होईल असे सांगितले. तसेच त्यांनी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुनील कटारिया यांनी विशेष परिश्रम घेतले असून सर्व क्लब सदस्यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे हा उपक्रम एक भव्य यशस्वी ठरला.
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुनील कटारिया, सचिव अमर गुरप,(पीडीजी) पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शिरीष रायते, सहाय्यक प्रांतपाल ईश्वर बोरा, माजी सहाय्यक प्रांतपाल प्रसन्न खाजगीवाले, माजी अध्यक्ष डॉ.कुणाल कोल्हे ,जिल्हा टीआरएफ संचालक हरीश नय्यर, जिल्हा चेअर मनीष बोरा, राजेश परदेशी, चेतन अमरापूरकर, हितेश गुप्ता, सुजाता कटारिया, मीनल बोरा, सतीश कटारिया, निवृत्ती झिने, सुनील मुथा, संजय मुनोत, वसंत मुनोत, विनोद भंडारी यांचा समावेश होता. तसेच सीक्यूएव्हीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल
नेहमीच पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करीत आहे.
Post a Comment