नगर - अहिल्यानगर शहरात संगीत प्रेमीं साठी आनंदाची पर्वणी ठरणारा “गोल्डन रेट्रो मेलोडीज एव्हरग्रीन हिट्स” हा भव्य लाईव्ह म्युझिकल ऑर्केस्ट्रा सोबत जुन्या गीतांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. ९०’ज टॉकीज क्लबच्या वतीने हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत माऊली संकुल सावेडीरोड अहमदनगर येथे होणार आहे.अशी माहिती डॉ दमण काशीद यांनी दिली.
७०-८० च्या दशकातील जुन्या हिंदी चित्रपट संगीताची मोहिनी पुन्हा अनुभवायला मिळणार असून या कार्यक्रमात अविस्मरणीय गाण्यांच्या सुरावटींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले जाणार आहे.
कार्यक्रमाचे संकल्पना व दिग्दर्शन डॉ. दमण काशीद (पाटील) व प्रशांत बंडगर यांनी केले असून प्रमुख गायक म्हणून डॉ. दमण काशीद आणि डॉ. गायत्री कुलकर्णी आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना भावमधुर प्रवास घडवतील. त्यांच्यासोबत इतर गायक कलाकार म्हणून विद्या तन्वर, डॉ सत्तार सय्यद, डॉ मनोज घुगे, प्रशांत बंडगर, संजय माळवदे, राजेंद्र शहाणे, श्रीपाद शहाणे, रोनित सुखधन,कु.आराधना गायकवाड, सुनीता धर्माधिकारी आदींचा सहभाग राहणार आहे.
यासाठी तब्बल २० वादक कलाकार सहभागी होत असून श्रीकांत गडकरी (ऑक्टापॅड/रिदम मशीन), सनी गायकवाड (ढोलक), अमित सालवे (कॉंगो/ढोलक), अभिजीत शर्मा (ड्रमसेट),सिद्धार्थ थट्टे (तबला), नितीन शिंदे (ट्रिपलॅड/डफ), सुधीर सोनवणे (फ्लूट), संकेत देहडे (लीड गिटार), प्रकाश लगड सर (बेस गिटार), महेश गुरव (सॅक्सोफोन), दिलावर शेख (सिंथेसायझर), राजेश देहडे (कीबोर्ड) नरेन साळवे,गिटार टीम प्रियंका पवार, आदिती राऊत, ग्रेसी डायमरी, मृणाल पालवे,शर्वरी मरकड, ट्रंपेट विलास गुरव, कोरस राजू कुलकर्णी, सुनील चांदणे, रोज जगताप, अश्विनी वैद्य, पर्कशनिस्ट विनोद पंडित, साऊंड सिस्टिम हरमन ऑडिओ ब्रिजेश बजाज, लाईट सिस्टम हरमन लाईट्स जीतु बजाज, अशा अनेक नामवंत कलाकारांच्या वादनाने कार्यक्रम रंगणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिनेश पाटोळे, डॉ. सचिन काकडे आणि डॉ.अविनाश वारे करतील.
हा भव्य संगीत सोहळा डॉ. दमन काशीद हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे व्यवस्थापन अॅड. चंदनशिव, महेश घावटे, सुशिल देठे, सचिन परदेशी, अजित रोकडे, प्रा.सारीका रघुवंशी ,महानुर सर, डॉ. कंगे यांनी केले आहे. रसिकांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे (पास आवश्यक) त्यासाठी ज्ञानेश्वर माने व महेश घावटे यांच्याशी ७३५०८८१५१५ / ८९५६३६३६६८ या नंबर वर संपर्क करावे.
नगरकर रसिकांना जुन्या हिंदी गाण्यांचा सुरेल खजिना पुन्हा अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार असून कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहून सुरांच्या या जादुई सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत बंडगर यांनी केले आहे.
Post a Comment