आबू रोड (राजस्थान) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालय माऊंट आबू येथील
शांतिवन कॅम्पस येथे मीडिया विंगच्या सौजन्याने 26 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राष्ट्रीय मीडिया महासम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय मीडिया महासम्मेलनाचे
उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती राम शंकरराव शिंदे यांच्या शुभहस्ते 27 सप्टेंबरला सकाळी 10:30 ला होणार आहे. मीडिया विंग च्या वतीने समन्वयक डॅा दीपक हरके यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना डॅा दीपक हरके यांनी ध्यानधारणेचे पुस्तक भेट दिले.
“समाजात शांती, एकता आणि विश्वास प्रस्थापित करण्यासाठी माध्यमांची भूमिका” हा या वर्षीच्या महासम्मेलनाचा विषय आहे.
या परिषदेत देशभरातून माध्यम क्षेत्राशी संबंधित विविध प्रतिनिधीं सहभागी होणार आहेत. त्यामध्ये वृत्तपत्र व मासिकांचे मालक, प्रकाशक, संपादक व संवाददाता, रेडिओ व टीव्ही चॅनेल्सचे सीईओ, डायरेक्टर, कार्यक्रम अधिकारी व पत्रकार, माहिती मंत्रालयाचे अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, न्यूज एजन्सीचे प्रतिनिधी, मीडिया प्राध्यापक व विद्यार्थी, लेखक, स्क्रिप्ट रायटर, चित्रपट निर्माता, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, सोशल मीडिया तज्ज्ञ, पब्लिकेशन व प्रिंटिंग प्रेस प्रतिनिधी, चित्रपटगृह संचालक, केबल ऑपरेटर तसेच टपाल विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे.
या महासम्मेलनात अंदाजे 1500 मीडियाकर्मी सहभागी होणार आहेत.
परिषदेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. भोजन व निवासाची व्यवस्था नि:शुल्क करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी डॅा दीपक हरके यांना मोबाईल क्रमांक 9122288888 वर संपर्क साधावा
Post a Comment