सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड गरजेचे - सौ.स्नेहल खोरे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 श्रीरामपूर भाजप व मोरया फाउंडेशन आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य हिताचा विचार करून सुरू केलेल्या आयुष्यमान भारत कार्ड कॅम्पचा प्रभाग १७ मधील कॅम्पचा शुभारंभ माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना सौ. स्नेहल खोरे म्हणाल्या की, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या नेतृत्वा खाली श्रीरामपूर शहरात पहिल्यांदाच भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प घेण्यात आला. यामध्ये तब्बल २८५ नागरिकांनी लाभ घेतला असून केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी मोरया फाउंडेशन कटिबद्ध आहे. 
आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून एका कुटुंबाला ५ लाखांपर्यंत वैद्यकीय मदत मिळणार आहे. आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प पुढील काही आठवडे राबविण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही सौ.खोरे यांनी यावेळी केले. 
यावेळी अशोक कोरडे, सीमा पटारे, अण्णासाहेब पंडित, राजकुमार काले, बाबुराव घोडेकर, रोहिणी लाड, द्रौपदी कल्याणकर, दिपाली ज-हाड, अंजली राजूळे, संदीप लचके, अमोल माळवे, अनिल कल्याणकर, इंदुमती शेलार, प्रवीण खरे, विजय जगताप, गणेश मगरे, सुनील नागरे, कुणाल दहिटे, संस्कृती जगताप आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा