आचार्य श्री आनंदऋषिजी म.सा. यांचे शिष्य उपाध्याय प्रवर प.पू. श्री प्रवीणऋषिजी म.सा. आदी ठाणा २ यांचा परिवर्तन चातुर्मास सध्या पुण्यातील वर्धमान प्रतिष्ठान, गंगाधाम येथे अत्यंत भक्तीमय तपश्चर्यापूर्ण व उत्सवपूर्ण वातावरणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात जाऊन दर्शनाचा धर्मलाभ घेण्यासाठी आज आनंदधाम येथील धार्मिक परीक्षा बोर्डात अहिल्यानगर सकल संघ तर्फे एक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीचे आयोजन चातुर्मास समिती २०२६ ने केले होते. यामध्ये अशोक (बाबूशेठ) बोरा, आदेश चंगेडिया, राजेश भंडारी, मनसुखलाल गुंदेचा, अनिल पोखर्णा, संतोष शेटिया, राजकुमार बोरा, रतिलालजी कटारिया, अॅड. अमृत मुथा, सुमतीलाल कोठारी, अरविंद गुंदेचा, संतोष बोरा, देवेंद्र गांधी, मदनलाल देसरडा, संजय बोरा, अशोक बलदोटा, अजित गुगळे, प्रमोद गांधी, सचिन डागा, सतीश गुंदेचा, संजय बोरा तसेच महिला वर्गातून सपना कटारिया, योगिता चंगेडिया, उल्का सोलंकी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यानगरच्या विविध सकलसंघांचे संघपती व प्रतिनिधी विशेष करून उपस्थित होते. यामध्ये श्री अनिल कटारिया (महावीर नगर), श्री अभय कोठारी (आगरकर मळा), श्री कांतिलालजी गांधी (सारसनगर), श्री संदीप गांधी (सावेडी) यांच्यासह केडगाव, नागापूर, विनायकनगर, महावीर चषक ग्रुप तर्फे संजय चोपडा, जय आनंद फाउंडेशन तर्फे कमलेश भंडारी, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान तर्फे ईश्वर बोरा, प्रतीक बोगावत आदींचा समावेश होता.
बैठकीत सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना “उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषिजी म.सा. यांचा २०२६ सालचा चातुर्मास अहिल्यानगर आनंदधाम येथे प.पू. महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म.सा. यांच्या नेश्रायात ऐतिहासिक व ना भूतो ना भविष्यति ठरावा,” असा निर्धार व्यक्त केला. यासाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्याचा संकल्पही सर्वांनी केला.
यासोबतच प्रत्येक सकल संघाकडून किमान एक बस पुणे दर्शन यात्रेसाठी येत्या रविवारी दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी पाठवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. पुणे दर्शन यात्रेसाठी प्रत्येक भाविकांकडून केवळ ₹200/- नाममात्र सहकार्य शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
बैठकीचा समारोप प.पू. श्री आलोकऋषिजी म.सा. यांच्या मंगलिकने झाला. त्यांनी आगामी चातुर्मास आयोजनासाठी मंगलाशिर्वाद दिले.
२०२६ चा आनंदधामातील चातुर्मास हा २००९ च्या तुलनेत अधिक भव्य, अद्वितीय व ऐतिहासिक ठरणार असून त्याची गाज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर होईल, असा ठाम विश्वास आयोजक समितीने व्यक्त केला.
⸻
👉 पुणे दर्शन यात्रेसाठी नावे नोंदविण्याकरिता संपर्क व्यक्ती :
• सावेडी : राजकुमार बोरा – 9422226393, संदीप गांधी – 8805566556
• महावीर नगर : अनिल कटारिया – 9822296965, अशोक बलदोटा – 9822040516
• आगरकर मळा : अभय कोठारी – 9420620000
• सारसनगर : कांतिलालजी गांधी – 9423792645
• एस.के. ज्वेलर्स (एम.जी. रोड) : ईश्वर बोरा – 9823799998
• आदेश चंगेडिया – 9011155555
• महावीर चषक परिवार : संजय चोपडा – 9822025757
• अर्ह्हम विज्जा परिवार : सपना विलास कटारिया – 8208718489
• योगिता चंगेडिया – 9921629550, उल्का सोलंकी – 8788793083
अपेक्षा संकलेचा -
9225314509
Post a Comment