मा. जिल्हाधिकारी साहेब,
मा. पोलीस अधीक्षक साहेब,
अहमदनगर.
विषय : मुकुंदनगर भागातील हिंदू समाजाच्या पलायनाविषयी फिरत असलेल्या अफवांबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्याबाबत.
महोदय,
अलीकडे सोशल मीडियावर “मुकुंदनगर भागातून हिंदू समाजाचे पलायन होत आहे” अशा प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. या अफवेमुळे समाजात गोंधळ, गैरसमज व असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. या संदर्भात वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे :
1. मुकुंदनगर हा ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेला भाग असून येथे शहा शरीफ बाबांची दर्गा आहे. या दर्ग्याशी छत्रपती घराण्याचा संबंध असून दरवर्षी तेथे त्यांच्या वंशजांचे दर्शन होते. तसेच या भागात फकीरवाडा, गोविंदपुरा येथे हिंदू, मुस्लीम, शीख समाज सलोख्याने एकत्र नांदतो. शीख समाजाचा गुरुद्वारा, खोजा समाजाचे प्रार्थनास्थळ या परिसरात आहेत.
2. या भागात अनेक हिंदू कुटुंबे वास्तव करीत असून त्यांचे दागदागिने व इतर व्यवसाय येथे सुरक्षितपणे चालतात. सोन्याची मोठी दुकानेही हिंदू समाजाची असून त्यांच्या ग्राहकांमध्ये मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे.
3. शासनाकडून या भागात मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर होऊन विकासकामे सुरू आहेत. दारूची दुकाने, हातभट्टी, अवैध धंदे किंवा वेश्याव्यवसाय येथे नाही.
4. या भागास लागून पोलीस अधीक्षक कार्यालय, निवासस्थान, महानगरपालिका कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे हा भाग पूर्ण सुरक्षित आहे.
5. खरी समस्या म्हणजे या भागातील नागरिकांना बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी, तसेच विकास निधी वाटपात अन्याय होत आहे. सावडीसारख्या उपनगरांच्या तुलनेत मुकुंदनगरकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
वरील सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर,
👉 प्रशासनाने पलायनाच्या अफवा तात्काळ फेटाळून लावाव्यात,
👉 खरी वस्तुस्थिती जाहीर करून समाजामध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करावा,
👉 तसेच मुकुंदनगर भागातील नागरिकांना समान न्याय व विकासाची वागणूक मिळावी, यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी आमची नम्र विनंती आहे.
आपला,
शाकीर शेख
📞 98 22 5500 23
Post a Comment