ब्रह्म कुमारी प्रतिष्ठानच्या मीडिया विंग तर्फे २६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत आबूरोड येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मखदुम उर्दू व मखदुम समाचार ची टीम देखील सहभागी झाली आहे. यामध्ये मुख्य संपादक आबीद दुले खान, कार्यकारी संपादक डॉ कमर सुरुर, उपसंपादक शेख फिरोज हसन, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शमा फारुकी, ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले,भुषण देशमुख, सुरेखा ढमाले, पंढरीनाथ गायकवाड आदींचा समावेश आहे.
शुक्रवार, दिनांक २६ ते मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या संमेलनात संपूर्ण भारतातील वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, सायबर मीडिया, दूरसंचार व पोस्ट विभाग तसेच मीडिया शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
निसर्ग व अध्यात्माचा संगम असलेल्या माऊंट आबू येथे सहभागी प्रतिनिधींना संमेलनासोबतच पर्यटनाचीही संधी मिळाली आहे. तलाव, धबधबे, बगीचे, डोंगर-दऱ्या, नेत्रदीपक सुर्यास्त दृश्ये तसेच देलवाडा मंदिरे, अचलगढ, गुरुशिखर, आबू अंबाजी, पीसपार्क, ज्ञानसरोवर, पांडवभवन, शांतीवन व ग्लोबल हॉस्पिटल यांसारखी आध्यात्मिक व ऐतिहासिक स्थळे आकर्षण ठरली आहेत.
Post a Comment