सर्वच शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे हेमकांत गायकवाड यांची निवेदनाद्वारे मागणी

अजीजभाई शेख / राहाता 
२८ सप्टेंबर हा दिवस सर्वच शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना (महाराष्ट्र राज्य) आणि ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना जळगांव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी 
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे ई - मेल निवेदनद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बहुतांश शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येत नाही,करीता आपल्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या सर्वच शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी केली आहे.
कारण माहिती अधिकार हा कायदा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे, तसेच या कायद्याचे महत्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी तसेच शासकीय आस्थापना म्हणून आपली देखील ही जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक - केमाअ २००८/पत्र क्र.३७८/०८/ सहा सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई दिनांक २० सप्टेंबर २००८ शासन निर्णय संदर्भानुसार आहे.
सदर निर्णयानुसार दर वर्षी शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश आहेत, या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी 
१) माहिती अधिकार विषय व्याख्यानमाला / चर्चासत्र, २) प्रश्नमंजुषा, निबंध, वकृत्व, इ. स्पर्धा, ३) माहिती अधिकार अधिनियंमावर आधारित प्रदर्शन, ४) स्थानिक नागरिक सामाजिक संस्था व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग,घ्यावा असे शासनाने सुचविलेले आहे. त्याची आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वच शासकीय कार्यालयात अंमलबजावणी व्हावी.
या वर्षी २८ सप्टेंबर २०२५ या 'दिवशी रविवार तसेच २७ सप्टेंबर शनिवार असल्यामुळे सुट्टी आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर २०२५ रोजी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा २६ सप्टेंबर २०२५ किंवा २९ सप्टेंबर २०२५ या दिवशी साजरा करावा, तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयांना तातडीने कराव्यात ही आपणास विनंती तसेच माहिती अधिकार कायद्या बाबत शासकीय अधिकारी व कर्मचारी नागरिकांमध्ये जनजागृती करून आणण्यासाठी वरील उपक्रम राबविण्यात यावेत अशी मागणी विभागीय आयुक्त नाशिक व जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे हेमकांत गायकवाड यांनी केली आहे.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा