ईद ए मिलादून्नबी निमित्त भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न... कर्मवीर चौक मित्र मंडळ व अल वारीस युथ फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
ईद-ए-मिलादुन्नबी ( पैगंबर जयंती) च्या निमित्ताने कर्मवीर चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कर्मवीर चौक मित्र मंडळ व अल वारीस युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात तब्बल १५० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या रक्तदान शिबिरात युवक वर्गाने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत रक्तदान करत सामाजिक भान जपले. जोंधळे ब्लड बँक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण व्यवस्थापन हाताळले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच या रक्तदान शिबिरात जमा झालेल्या रक्तापैकी ५० पिशव्या गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णां साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ही एक महत्त्वपूर्ण बाब असून, गरजू लोकांपर्यंत नि:स्वार्थ मदत पोहोचवण्याचा आमचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
सध्या काही ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाच्या नावाखाली केवळ डीजे, ढोल-ताशा, आणि लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. त्या तुलनेत, आजचा हा कार्यक्रम एक सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी उदाहरण ठरला. आयोजकांनी गरजूंना मदत करण्यासाठी खऱ्या अर्थाने पैशाचे व वेळेचे मूल्य दाखवून दिले.
     या उपक्रमात विविध धर्म,जाती-पंथातील लोकांनी एकत्र येत रक्तदान केले. हा शांतीचा व एकतेचा संदेश देणारा कार्यक्रम ठरला. “रक्त कोणाचेही नसते, ते फक्त जीवन वाचवते”, ही भावना लोकांच्या कृतीतून उमटत होती.
या कार्यक्रमाद्वारे कर्मवीर चौक मित्र मंडळ आणि अल वारीस युथ फाऊंडेशन ने हा कार्यक्रम म्हणजे केवळ धार्मिक उत्सव न ठरता, समाजाच्या आरोग्यासाठी दिलेलं एक योगदान आहे असा संदेश दिला.

*वृत्त विशेष सहयोग*
इम्रानभाई शेख - श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा