निर्जंतुक केलेल्या उपकरणांचा वापर करूनच काळजीपूर्वक आरोग्य सेवा घ्या - आदिल शेख

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
निर्जंतुक केलेल्या उपकरणांचा वापर करूनच काळजीपूर्वक आरोग्य सेवा घ्या असे प्रतिपादन पुणतांबा ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आदिल शेख यांनी तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या "युवकांचे आरोग्य"  या कार्यशाळेत केले. 
ते पुढे असे म्हणाले की, एचआयव्हीचे संक्रमण प्रामुख्याने लैंगिक संबंधातून होते, एचआयव्ही बाधित आईकडून तिच्या बाळाला गर्भधारणा प्रसूती किंवा स्तनपान दरम्यान होते. यापासून बचाव करण्यासाठी सुया (सिरींज) शेअर न करणे, लवकर चाचणी करणे आणि आवश्यक उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
स्वची जाणीव असणे, परिणामकारक संप्रेषण करणे सर्जनशील विचार ठेवणे, भावनांचे समायोजन करणे, चिकित्सक विचार ठेवणे, निर्णय क्षमता बाळगणे, समानअभूती बाळगणे, ताण-तणावांचे व्यवस्थापन करणे, मानसिक आरोग्य चांगले ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वतःचे आरोग्य स्वतः सांभाळा, निर्व्यसनी रहा, आपला आहार व्यवस्थित ठेवा. आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवा, अनैतिक संबंध ठेवू नका, एकच जोडीदार ठेवा. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ओळखायला शिका, भावनेच्या भरात वाहत जाऊ नका. अपघाताच्या वेळी मदत करताना हॅंडग्लोज वापरा. टॅटू काढू नका. टॅटू काढले तर निर्जंतुक उपकरणे वापरा, दाढी करताना नवीन ब्लेड वापरणे ,लग्न जमविताना आरोग्य पत्रिका तपासणी महत्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या.

कार्यशाळेचे आयोजन व संयोजन विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ. संजय नवाळे व प्रा.ओंकार मुळे, डॉ. बाळासाहेब बाचकर यांनी केले. कार्यशाळेसाठी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर -9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा