प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश मुठे यांच्याकडून शाळेस शैक्षणिक साहित्य भेट

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
ज्या शाळेने पायाभरणी केली तसेच जिद्द व कष्ट करण्याची हिम्मत दिली त्या शाळेला आपण कदापिही विसरू शकणार नाही असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण घेणारे ऋषिकेश मुठे यांनी केले.
बालवयात ज्या शाळेत जिद्द व चिकाटीचे धडे घेतले अशा अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरवाडी (वागदरी) ता .अकोले या शाळेचे  माजी विद्यार्थी ऋषिकेश मुठे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट देऊन विद्यार्थ्यांची दिवाळी साजरी केली.
ऋषिकेश बाळू मुठे (हल्ली कोपरा मांडवा) हे सध्या स्थितीत पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण घेत आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण अर्धवट सोडलेली आई आणि वडील  यांच्या खंबीर साथीने त्यांनी शालेय शिक्षण पार पाडले. गावातील शाळेचे ऋण फेडता येत नसले तरी व्यक्त करण्याचा त्याचाच एक भाग व्यक्त म्हणून श्री. मुठे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांची आई विमलताई मुठे व केंद्रप्रमुख शकील बागवान यांचे हस्ते दहा हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप केले.
याप्रसंगी शाळेतील पालक मुख्याध्यापक लक्ष्मण धिंदळे, उपाध्यापिका सुरेखा घुटे, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
----------------------------------------------------
*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक परिस्थितीवर मात करून मातृभाषेतील शिक्षण घेऊन प्रसंगी वर्गात शांत न बसता शिक्षकांकडून आपल्या प्रत्येक शंकेचे निरसन करून आकाशात झेप घ्यायला शिकावे.आई वडिलांनी देखील प्रत्येक क्षणी विद्यार्थ्यांसोबत असायला हवे.- विमलताई बाळू मुठे*
----------------------------------------------------
*वृत प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा