स्वयंसेवक व्हा आणि सेवा करा - बंडुकाका दहातोंडे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 महाराष्ट्रातील सर्व देवस्थान मधे निशुल्क सेवा देणारी संस्था म्हणजेच शनीसेवा सोशल फाउंडेशन चे नांव घेतले जात आहे. आणि या सेवेच्या माध्यमातून शनीसेवा सोशल फाउंडेशन ने कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी देवस्थान येथे सेवा दिली यावेळी फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडुकाका दहातोंडे बोलत होते. 

शनीसेवा सोशल फाउंडेशन या सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील श्रीक्षेत्र देवगड, काळभैरवनाथ आगडगांव, पंढरपूर, मायंबा देवस्थान सावरगांव तसेच प्रत्येक अमावस्येला चैतन्य कानिफनाथ मंदिरामध्ये सेवा देत आहेत. यासोबतच या फाउंडेशन च्या वतीने सामाजिक कार्य देखील केले जाते. आषाढी एकादशीच्या दिंडी सोहळ्यात पायी जाणाऱ्या भाविकांना दरवर्षी डॉ. सुधाकर निकाळजे व वृषभ गांधी, निरज मनोचा हे मोफत वैद्यकीय सेवा देत असतात. तसेच या फाउंडेशन च्या माध्यमातून लवकरच उत्कृष्ट व्यक्तीमत्व, उत्कृष्ट विद्यार्थी असे पुरस्कार देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मोहटा देवी येथे सेवेसाठी फाउंडेशन चे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा सल्लागार बाळासाहेब वर्मा, अशोक हराळे,  महाराष्ट्र राज्य सचिव शिवाजी दहातोंडे, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख डॉ. सुधाकर निकाळजे, शशिकांत कर्डिले, शिवाजी शेळके, विठ्ठलराजे दहातोंडे, संजय वैरागर, कैलास केंकाण, संभाजी गवळी आणि महिला जिल्हाध्यक्षा प्राथमिक शिक्षका शांता मरकड - दहातोंडे, अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्या संगीता निंबाळकर, मनिषा बोरुडे, ताराबाई जावळे, रंजना बोरुडे , रंजना नवले, सीता दहातोंडे, अर्चना दहातोंडे, लता बोरुडे, मुक्ता घनवट आदी सहभागी होते. 
ही निशुल्क सेवा करत असताना जे मानसिक सुख: मिळते ते कुठेच नाही तसेच डिसेंबर महिन्यात मोहटा देवी येथे देवी भागवत होणार आहे आणि त्यावेळी कमीत कमी एक ते दीड लाख भाविक येतील आणि त्या भाविकांची सेवा करायची संधी शनीसेवा सोशल फाउंडेशन ला मिळणार आहे व लवकरच तिरुपती बालाजी येथे तीन दिवस सेवा करण्यासाठी सदरील फाऊंडेशन चे सदस्य जाणार आहेत आणि शनीसेवा सोशल फाउंडेशन मधे सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील राज्याच्या सर्वच जिल्ह्यातून तसेच प्रत्येक तालुक्यातून भरपूर स्वयंसेवक सेवा देण्यास इच्छुक असल्याचे संस्थापक अध्यक्ष कमलेश शेवाळे (देवा) यांनी सांगितले.
सेवा देण्याकरीता सदस्य होण्यासाठी ९८५०२१२२४४ या क्रमांकावर संपर्क करावा असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार कमलेश
 शेवाळे (देवा) नेवासा 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता न्यूज सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा