नगर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक लिखाण करणाऱ्या व्यक्तीचा प्रथम समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले. त्यामुळे भारतातील सर्वच जातीधर्माचे नागरिक सुरक्षित आहे. तसेच त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार दिले म्हणून त्यांचे या देशावर खूप मोठे उपकार आहेत. हे कोणत्याही समाजाचे नागरीक विसरुच शकत नाही. इंप्रियलचौक माळीवाडा या ठिकाणी फरीद सुलेमान खान नामक आरोपीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमान कारक लिखाण करून फेकले. हा प्रकार खूप निंदनीय आहे. त्याचा तपास होऊन वरील आरोपी हा अटक झाला. परंतु दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने अशे प्रकार नगर शहरात व जिल्ह्यात का घडत आहे, या मागचा उद्देश स्पष्ट व्हावा. तसेच सदरील प्रकार हे कोणाचे सांगणे वरून घडत आहेत ? या मागचा मोहरक्या शोधून काढावा अशी समस्त मुस्लिम समाजाची मागणी आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्याच बरोबर वरील कृत्य करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आरोपीचा आणि मुस्लिम समाजाचा काही एक संबंध नाही व मुस्लिम सामज अश्या मानसिकतेचा कदापी समर्थन करणार नाही. त्याने जे कृत्य केले आहे ते माफीच्या लायक नाही. म्हणून सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही समस्त मुस्लिम समाजाची मागणी आहे.असे निवेदन समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.
إرسال تعليق