नगर - शांतीनगर येथील ठाकुरदास परदेशी व त्यांच्या कुटुंबीयांनी साकारली आहे दहा बाय दहा आकाराची जलदुर्ग विजयदुर्ग ची प्रतिकृती. गेल्या 12 वर्षापासून विविध किल्ल्यांची प्रतिकृती सदर कुटुंब तयार करीत आहेत. ही प्रतिकृती दरवर्षी दिवाळीनंतर लोकांना पाहण्यासाठी खुली असते.
यावेळी बुधवार पासून सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती त्यासाठी पत्ता ठाकूरदास परदेशी प्लॉट नं.2, " शांतीकुंज" शांतीनगर (सारसनगर),पाण्याची टाकीजवळ अहिल्यानगर 9860207076 या नंबरवर संपर्क साधावे. ही प्रतिकृती सोमवार दि.10 /11/ 2025 पर्यंत सर्वांसाठी खुली आहे.जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी भेट द्यावी. (प्रतिकृति पाहण्यासाठी साठी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वा. पर्यंत वेळ आहे. ) असे आवाहन ठाकुरदास परदेशी यांनी केले आहे.
إرسال تعليق