रेहान काझी व त्यांचे प्रवक्ते यांनी समाजाची दिशाभूल करू नये - युनूस तांबटकर

अहिल्यानगर - नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट F-17 संदर्भात रेहान काझी व इतर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल करणारे वक्तव्य करून समाजाची फसवणूक करत आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की आम्ही उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशानुसार आज तागायत कामकाज करत आहोत. आमचे सर्व व्यवहार चेक ने केले जातात,कारण संस्थेचे आर्थिक व्यवहार रोखीने होत नाही.या कारणास्तव कोणीही रोखीचा व्यवहार करू नये. 2265/2017 हा चौकशी अर्ज होता यामध्ये यांनी असे आदेश दिले होते की परिशिष्ट एक वर असणाऱ्या विश्वस्तांनी नवीन विश्वस्तांची नेमणूक करावी. परिशिष्ट एक नुसार रशीद दाऊद खान हे एकच विश्वस्त हयात आहेत. पाच विश्वस्तांची संस्थेच्या सभासदांची सभा घेऊन नेमणूक केली त्यानुसार 1457 2021 त्यांच्या सहीने व शपथेवर दाखल करण्यात आले होते. त्यावर सुनावणी होऊन निर्णय देण्यात आलेला आहे. सदर निर्णयामध्ये युनूस सुलतान तांबटकर यांनी कामकाज करू नये अशे कोणतेही आदेश धर्मदाय आयुक्त यांनी दिलेले नाही.
असे असताना रेहान काझी यांना कायदेशीर कोणताही अधिकार नव्हता व नाही यांनी बेकायदेशीर रित्या संस्थेच्या जागेतील वर्गाचे व शाळेच्या ऑफिसचे कुल्प तोडून स्वतः विश्वस्त आहेत असे भासवण्याचे प्रयत्न केलेले आहे. यामुळे या बोगस लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. तसेच रोख स्वरूपात पैसे जमा केल्याबद्दल धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांनी अर्ज क्रमांक 61/ 2023 नुसार चौकशीचे आदेश दिलेले आहे. संस्थेचे सर्व व्यवहार हे चेक ने केले जातात. कोणताही रोखीचा व्यवहार होत नाही. रेहान काझी यांनी परस्पर संस्थेच्या नावावर व कॉलेज आणि एम इंग्लिश चे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. ही सत्य परिस्थिती असताना सभासदांची व भाडेकारींची  दिशाभूल करणारे बातम्या देऊन स्वतः केलेला भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा