नमस्कार मित्रांनो, प्रथमतः जे पुरूष असतील अशा सर्व पुरूषांना जागतिक पुरूष हक्क दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 19 नोव्हेंबर हा जागतिक पुरूष हक्क दिन आहे. पुरूष हक्क संरक्षण समिती बीड च्या वतीने लवकरच इचलकरंजीत किंवा पन्हाळा जि कोल्हापूर येथे पुरूष हक्क संरक्षण समिती चे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न होत . पुरूष हक्क संरक्षण समिती ही 1996 मध्ये नाशिक येथे ॲड धर्मेंद्र चव्हाण, डाॅ सुनिल घाडगे ॲड प्रेमनाथ पवार यांच्या मार्गदर्शना खाली नाशिक येथे स्थापन झाली आहे. सध्या अनेक राज्ये आणि जिल्हा पातळीवर समिती चे कामकाज चालु आहे. आत्ता पर्यंत समितीचे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अधिवेशन झाले आहेत. 17 वे राष्ट्रीय अधिवेशन अहिल्यानगर येथे संपन्न झाले होते. समिती चे कार्य म्हणजे पिडित पुरूषांना व अन्यायग्रस्त महिलांना सुद्धा न्याय मिळवून देणे आहे. सध्या अहिल्यानगर मध्ये ॲड धर्मेंद्र चव्हाण व डाॅ सुनिल घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष म्हणून ॲड शिवाजी अण्णा कराळे, ॲड प्रकाश हिवाळे, ॲड सतीश पारखे , सिध्दार्थ दिक्षित, शशिकांत नजन, तुषार घुले, सुधीर वाघ, अभिजित मोरे इत्यादी अनेक कार्यकर्तॅ काम करीत आहेत. कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी प्रयत्न करणे हाच या समितीचा उद्देश आहे. त्यामुळेच प्रत्येक महिन्याचे दुसर्या आणि चौथ्या शनिवारीच सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत पिडीत पुषांना अ नगर येथील कार्यालयात समुपोदेशन केले जात आहे.
संपुर्ण देशभर 8 मार्च हा महिला दिन म्हणून अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. समाजातील चांगले काम करणा-या महिला भगिनी, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि आपला ठसा उमटवत पुढे जात असलेल्या महिला भगिनी यांना महिला दिनाच्या निमित्ताने सन्मानित केले जाते. खरोखरच याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या देशाचे नाव जरी भारत असले तरी आपण भारत माता म्हणून जयजयकार करतो. आपल्या देशाला राजमाता जिजाऊ माॅ साहेब , राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, गोरगरीब लोकांना शिक्षण देणा-या सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या पासुन तर आतापर्यंतच्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शनी स्वर्गीय इंदिरा गांधी, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार, आताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, गाण कोकीळा स्व लता मंगेशकर, पहिल्या महिला डाॅक्टर आनंदीबाई जोशी या आणि अशा अनेक महिला मुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. सर्व देशाला या महिलांचा सार्थ अभिमान आहे.
जस जशी देशभर क्रांती घडत गेली आणि आपला देश स्वतंत्र झाला. आपल्या देशाचे संविधान डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार करून ते भारताच्या स्वाधीन केले आणि आपला देश प्रजासत्ताक झाला. इंग्रजी कायदे जाऊन आपले कायदे तयार झाले. संविधाना नुसार आपल्या देशातील स्रीया आणि पुरूष यांना लागु होतील असे समान कायदे मिळाले. परंतु जसजसे दिवस पुढे सरकत होते तसतसे अनेक कायद्यात बदल करण्यात आले. आपल्या देशातील अबला नारीला सशक्त करण्या साठी त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून वेगवेगळ्या कायद्याची निर्मिती झाली. जर एखाद्या महिलेला तिचा पती सांभाळत नसेल व तिला माहेरी ठेवले असेल आणि तिच्या अन्नवस्राची व्यवस्था केली नसेल क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 125 तर (बी.एन. एस. एस. 2023 चे कलम 144) प्रमाणे ती आपल्या पतीकडून पोटगीची रक्कम मे कोर्टात जाऊन ठरवून घेऊ शकते. एखाद्या महिलेच्या पतीने पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न केले तर पहिली पत्नी भा.द.वि. कलम 494 ( BNS 82) अन्वये गुन्हा दाखल करू शकते. महिलेची जर कोणी छेड काढली व अश्लील वागले तर भादंवि 354(BNS 74,75) प्रमाणे ती महिला विनयभंगाची केस दाखल करू शकते तसेच एखाद्या महिलेच्या इच्छेच्या विरूध्द जबरदस्तीने तिच्याबरोबर शरीरसंबंध केले तर ती महिला भादवि 376 (BNS 65-1)प्रमाणे गुन्हा दाखल करू शकते. तसेच एखाद्या महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी हुंडा मागणी केली किंवा तिच्या माहेरवरून पैसे आणण्यासाठी जबरदस्ती केली तर तर ती महिला आपल्या सासरच्या लोकांचे विरूध्द भादवि 498 (BNS 85)प्रमाणे गुन्हा दाखल करू शकते. तसेच 2005 मध्ये आलेल्या महिलांचा घरगुती छळ कायद्याने सुद्धा प्रोटेक्शन मागु शकते. म्हणजेच अबला महिलांना सबला करण्यासाठी वरील कायद्याची संरक्षण ढाल महिलांना मिळाली आहे. या कायद्यामुळे नक्की महिला सबलीकरण झाले का हा विषय शोधाचा आहे. कारण ब-याच वेळेस काही महिला कायद्याचा वापर ढाल म्हणून करत नाहीत तर तलवार म्हणून करताना दिसतात. सध्या जसा महिला आयोग आहे तसाच पुरूष आयोग सुद्धा झालाच पाहिजे असे वाटते आहे. सध्या कौटुंबिक समस्या मिटविण्यासाठी व समुपोदेशन करण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशन च्या आवारात एक भरोसा सेल असते. तसेच पुरूषांच्या तक्रारी समजुन घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी पुरूष समोपदेशन केंद्र झाले तर ब-याच प्रमाणात कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी मदत होईल. पुर्वी आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती पहायला मिळत होती, पण सध्या एकत्र कुटुंब पद्धतीला कुणाची दृष्टी लागली हेच समजायला तयार नाही. आजीच्या गोष्टी ऐकत नातवंड झोपी जात होते. आई बापाच्या वाटण्या होत नव्हत्या. आई बाबाचा शब्द हा कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी प्रमाण मानून कुटुंबातील सर्व सदस्य एकोप्याने राहत होते. कलियुग आले आणि नको त्या गोष्टी पहायची वेळ आली. झाकुन ठेवायच्या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पहात आपली तरूण पिढी जगतेय. मग महिला असो की पुरूष असो प्रत्येकाला आपापल्या परीने जसा जमेल तसा जगण्यासाठी प्रयत्न करावा लागला आहे. ज्या आईवडीलांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन सक्षम केले तीच मुले पुढे आईवडीलांना वृध्दाश्रमात सोडू लागली. या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याचा उद्देश एकच आहे की, सध्या पतिपत्नीचं नातं विश्वासाचे राहिले नाही. यातुनच अनेक कायदे महिलांना संरक्षण मिळावे म्हणून तयार केले त्या कायद्याचा आधार घेण्यात येऊन दुरूपयोग जास्त प्रमाणात व्हायला लागला आहे. त्यातच नवीन लिव्ह ॲण्ड रिलेशन सारखी पाश्चात्य देशात चालणारी प्रथा आपल्या देशात आली सर्व कुटुंब व्यवस्था -हसातळाला गेली. थोडक्यात सांगायचे तर कुणाचेच कुणावर बंधन राहिले नाही. स्वैराचार वाढला आणि त्यातूनच लोकांच्या गरजा वाढल्या. अनावश्यक गरजा पुर्ण करण्यासाठी महिला कोणत्याही स्तरावर जायला लागली. या विज्ञान युगात तर मोबाईल नावाच्या हत्याराने अनेक कुटुंबाचे वाटोळे झाले. पुर्वी घरातील भांडण उंब-याच्या बाहेर, उंब-यातील भांडण चावडीच्या बाहेर आणि चावडीच्या आतले भांडण वेशीच्या बाहेर कधीच जात नव्हती. घटस्फ़ोट घेण्यापर्यन्त कोणाचीही हिंमत होत नव्हती. पण सध्या कायद्याचा दुरूपयोग इतका वाढला की, महिला आपल्या सासरच्या लोकांचे विरूध्द खोट्या आणि बनावट तक्रारी जास्त प्रमाणात करायला लागल्या आहेत. तक्रार करताना आपल्या मुलाबाळांचा विचारही केला जात नाही. मुलांना तर आई आणि बाबा दोन्ही पाहिजे असतात. पण ज्या मुलांना सहमतीने जन्म दिला त्यांचीच कष्टडी मागण्यासाठी कोर्टात जावे लागते यापेक्षा अधिक दुर्दैव काय असु शकते. सध्या महिला या सुशिक्षित आणि कमावत्या झालेल्या आहेत त्यामुळे दोघांमध्ये इगो प्रोब्लेम झाला आहे. त्यातच मुलीच्या संसारात तिच्या आईवडील, मेव्हणे यांचा अनावश्यक हस्तक्षेप जास्त वाढला आहे. त्यामुळे तर अनेक मुलामुलींचे संसाराची राखरांगोळी झाली आहे. आता तर चार सहा महिन्यातच संसार संपलेला दिसतो. थोड्या थोड्या गोष्टी पोलिस स्टेशन आणि कोर्टात यायला लागल्या आहेत. परंतु जरा सबुरीन घेतलं तर तर कुणाचेच कुटुंब विस्कळीत होणार नाही. त्यातच राजकीय लोकांनी तर उच्छाद मांडला आहे. खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी महिलाना पुढे केले जाते. कधी कधी तर एखादी महिला प्रेम या संकल्पनेखाली नको तेवढ्या पातळीवर जाते आणि मग पुरूषांच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन ब्लॅकमेल करायला मागे पुढे पाहत नाहीत. कमी कष्टात जास्त पैसे मिळतात म्हणून काही महिला कोणत्याही प्रकारचे काॅम्प्रमाईज करायला मागे पुढे पाहत नाहीत. सध्या तर विनयभंग, बलात्कार या सारख्या गुन्ह्यावर किती विश्वास ठेवायचा हाच प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अशा प्रकारे दाखल केलेल्या तक्रारी कोर्टात आल्यावर आपसात तडजोड करून मिटवल्याही जातात. मग पहिल्यांदा दाखल केलेले गुन्हे खरे होते की खोटे होते हेच समजत नाही. सासरच्या लोकांचे विरूध्द विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिला जातो. सध्या तर कोणतीही महिला आपल्या पतीवर पोलिस स्टेशन अथवा न्यायालयात केस दाखल करते. परंतु जर एखादा पुरूष जर पोलिस स्टेशन मधे आपल्या पत्नी आणि तिच्या आईवडील आणि इतर नातेवाईक यांचे विरोधात तक्रार करायला गेला तर पहिल्यांदा पोलिस त्या पुरूषाची तक्रार घेण्याऐवजी त्याचेकडे पाहुन कुत्सितपणे हसतात. आणि मग त्याच्या हातावर वाटाण्याच्या अक्षता ठेवून वाटे लावतात. त्या पुरूषांना पोलिस स्टेशन, भरोसा सेल येथे कधीच न्याय मिळत नाही हि सत्यता सुद्धा नाकारता येणार नाही. मग तो व्यसनाधिन होतो ,कधी कधी तर आत्महत्या सुध्दा करतो. असे अनेक अपप्रकार घडले आहेत. सध्या कोणत्याच पोलीस स्टेशन मध्ये पिडीत पुरुषांच्या तक्रारीवरून महिलेच्या विरूध्द गुन्हे दाखल होत नाहीत. एक प्रकारे हा अन्यायच आहे. ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्यांवर अथवा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होतो तेव्हाच सर्व यंत्रणा कार्यान्वित होतात. पण सर्व सामान्य पिडीत पुरुषांवर अन्याय होतो तेव्हा कोणीच पुढे येताना दिसत नाहीत. अशा सर्व पिडीत पुरूषांना पुरूष हक्क संरक्षण समिती मदत करत आहे.
जसा आपण व सरकार महिला दिन म्हणून अतिशय उत्साहाने साजरा करतो तसाच पुरूष हक्क दिन का साजरा करत नाहीत.? सर्व माध्यमं पुरूष हक्क दिनाची दखल का घेत नाहीत? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
या जगात पुरूषांनी काहीच मौल्यवान कामगिरी केली नाही का ? अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शुरवीर राणाप्रताप, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पासुन तर थेट आत्ता पर्यंतचे औद्योगिक, कला,क्रीडा, साहित्य, सामाजिक, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पुरूष सुद्धा आहेत हेच नेमकं कसं विसरून जातं. प्रसार माध्यमांनी या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत. वास्तविक पतिपत्नीचं नातं विश्वासाचे असतं आणि ती दोन्हीही संसाररूपी रथाचे दोन चाके आहेत. एक जरी चाक निखळलं तर संसाराचा रथ जागेवरून हलणारच नाही. सध्या वयोवृद्ध माणसं तर डस्टबीन झाले आहेत. त्यांचेकडे लक्ष द्यायला नोकर ठेवला जातो पण स्वतः ची मुलं विचारपुस करत नाहीत. आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत. अजून काय काय पहावे लागेल हे सांगणे कठीण आहे. परंतु एक मात्र निश्चितच आहे की, सध्या काही बेजबाबदार महिला सर्रासपणे कायद्याचा दुरूपयोग करताना दिसतात आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस आणतात. या साठी एकच पर्याय आहे की,ज्याची चूक त्यालाच सांगितली तर लवकर सुधारणा होईल.
दरवर्षीच अधिवेशनात पत्नी पिडीत पुरूषांना व महिलांना सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी कायदेविषयक चर्चासत्रे आयोजित केली जात आहेत. पुरूष हक्क समितीचे ॲड बाळासाहेब पाटील सांगली, ॲड संतोष शिंदे पुणे, ॲड मधुकर भिसे धुळे , संस्थापक सचिव ॲड धर्मेंद्र चव्हाण व अध्यक्ष डॉ सुनिल घाडगे नाशिक यांचे सह अनेक अनुभवी वकील मंडळी कायदेविषयक चर्चा सत्रात सहभागी होऊन मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रातील सर्व पत्नी पिडीत पुरूषांनी अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐
ॲड शिवाजी (अण्णा)
कराळे पाटील
जिल्हाध्यक्ष-पुरूष हक्क संरक्षण समिती, अहमदनगर
मो न 99 22 545 545
إرسال تعليق