नगर-शहरातील सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत ‘जावेद मास्टर प्रस्तुत बिनाका गीतमाला (भाग १६)’ हा सुरेल कार्यक्रम शुक्रवार १२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सावेडी येथील माऊली सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे जावेद मास्टर यांनी सांगितले. शहरातील नागरिकांसाठी हा एक अविस्मरणीय संगीतसोहळा ठरणार आहे.
कार्यक्रमात जावेद मास्टर, मनोजकुमार, इकबाल बागवान, उसामा शेख, प्रवीण शिंगी, सुनील भंडारी, मोहसीन सैफी, अस्लमकुमार, निलेश गायकवाड, बालाजी गंगावर, प्रशांत छल्लानी, संजय भिंगारदिवे, विद्या तनवर, आरती दिक्षित (पुणे) निलेश गाडेकर आणि बालाजी गंगेकर यांचे सादरीकरणे रंगणार आहेत. सुत्रसंचालन शिवकुमार सलुजा (पुणे) सांभाळणार आहेत.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमातून लता मंगेशकर, आशा भोसले, मुकेश, मोहम्मद रफी, किशोर कुमार, शब्बीर कुमार मोहम्मद अजीज, सुमन कल्याणपूर यांसारख्या महान गायकांची अमर गाणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. जुन्या सुवर्ण गाण्यांचा हा जल्लोष रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विनामूल्य प्रवेशिके साठी 99603 71497 या नंबरवर संपर्क साधावे.
या कार्यक्रमाला डॉ. काशीद हॉस्पिटल आणि साई आदर्श मल्टिस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसा. यांचे सहकार्य लाभले आहे. शहरातील संगीतप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल संध्याकाळचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment