शब्दगंधच्या उपक्रमामुळे नवोदितांना चालना - शब्बीर शेख

नगर - शब्दगंधच्या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे नवोदित साहित्यिकांना चालना मिळत असून सक्षम साहित्यपिढी घडवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, संकलक शब्बीर शेख यांनी केले.
       शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शब्दगंध चे संस्थापक, सचिव सुनील गोसावी, कवी सुभाष सोनवणे, प्रा.डॉ.अनिल गर्जे, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, प्रा.डॉ.अशोक कानडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शब्दगंध दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. 
पुढे बोलताना शब्बीर शेख म्हणाले की, सातत्यपूर्ण उपक्रमामुळे शब्दगंध हे नाव साहित्य क्षेत्रात अग्रगण्य मानले जाते, नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवत असल्याने लेखक,कवींना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असून ही अत्यंत  महत्त्वाची गोष्ट आहे.
       यावेळी राजेंद्र उदागे यांच्या मातोश्री श्रीमती शशिकला भाऊसाहेब उदागे,कोल्हापूर येथील जेष्ठ लेखक डॉ. सुनीलकुमार सरनाईक, ज्येष्ठ लेखक,संकलक अरुण आहेर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुढील उपक्रमाबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सुभाष सोनवणे यांची निमगाव वाघा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर स्वाती अहिरे यांना नजुबाई गावित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बबनराव गिरी, प्रसाद भडके, मकरंद घोडके, रूपचंद शिदोरे, कार्तिक झेंडे,जयश्री राऊत, शर्मिला गोसावी, सरला सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा.डॉ.अनिल गर्जे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले तर बबनराव गिरी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. शेवटी राज्य संघटक प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा गोसावी, ऋषिकेश राऊत, भाग्यश्री राऊत, हर्षली गिरी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा