मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या कल्याणासाठी राखीव असलेला १५% निधी सलग तीन वर्षे खर्च न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर विषयावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशिष भंडारी यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली.
    शासकीय नियमानुसार ग्रामपंचायतीने स्वनिधीतील १५% हिस्सा मागासवर्गीय घटकांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, आगडगावसह अनेक ग्रामपंचायतींनी सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांत हा निधी खर्च केला नाही. स्थानिक सदस्य आणि ग्रामस्थांनी वारंवार लेखी विनंती करूनही सरपंच व ग्रामसेवकांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. हा निधी जाणीवपूर्वक 'लॅप्स' (Lapse) केला जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
    तक्रारीची दखल घेत सीईओ आशिष भंडारी यांनी संबंधित विभागाला तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
 . निधी खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींची उच्चस्तरीय चौकशी करून श्वेतपत्रिका जाहीर करावी.
 . कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत कडक कारवाई व्हावी.
 . येत्या ७ दिवसांत प्रशासनाने लेखी उत्तर देऊन कार्यवाही सुरू करावी.
प्रशासनाने विहित मुदतीत ठोस पावले न उचलल्यास पंचायत समितीवर भव्य जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी योगेश साठे यांनी दिला. यावेळी आगडगावचे ग्रामपंचायत सदस्य क्रांती शिरसाठ, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, रवींद्र शिरसाठ, अशोक भिंगारदिवे, हिरामण भिंगारदिवे, देवराम भिंगारदिवे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा