मिल्लतनगर, वॉर्ड क्रमांक 1 येथील अवघ्या पाच वर्षांच्या आयेशा हसन इनामदार हिने रमजान महिन्यात आपला पहिला रोजा पूर्ण ठेवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. इतक्या लहान वयात तिने दाखवलेली श्रद्धा आणि चिकाटी पाहून कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरातून तिचे कौतुक केले जात आहे.
आयेशाने उत्साहाने आणि आनंदाने आपला पहिला रोजा पूर्ण केला. दिवसभर संयम राखत तिने रोजा पूर्ण केल्याने घरातील वातावरण आनंदमय झाले. तिच्या या प्रयत्नाचे विशेष कौतुक तिचे आजोबा हुसेन नूरमोहम्मद इनामदार, चाचा तसेच मोहल्ल्यातील नागरिकांनी केले.
स्थानिकांनी सांगितले की, “अवघ्या पाचव्या वर्षी आयेशाने ठेवलेला पहिला रोजा ही अभिमानाची बाब आहे. तिच्या या प्रयत्नामुळे इतर लहान मुलांनाही प्रेरणा मिळेल.”
Post a Comment