कोपरगाव (प्रतिनिधी) - दरवर्षी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो,शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य,कोपरगाव शाखेच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.सी. एम.मेहता कन्या विद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थीनींना प्रेरणा देण्यासाठी कविता वाचन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांच्या संकल्पनेतून व
कोपरगाव शाखेच्या अध्यक्षा सौ. ऐश्वर्यलक्ष्मी संजय सातभाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती मुळे, सौ. वंदना चिकटे यांनी काव्यवाचन आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या अनिता धनक या होत्या. शाळेतील मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सर्व सहभागी कविंना प्रमाणपत्र, शब्दगंध प्रकाशित जेष्ठ लेखक डॉ.दादासाहेब गलांडे लिखित पुस्तक व माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या वतीने पेन देऊन सन्मानित करण्यात आले. समारंभासाठी उपप्राचार्या उज्वला म्हस्के, पर्यवेक्षक सुनिता पवार, पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे, कवी बाळासाहेब देवकर,शब्दगंध साहित्यिक परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख हेमचंद्र भवर, कवी प्रमोद येवले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सांस्कृतिक विभागाच्या श्रीमती मुंढे ताई यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या कोपरगाव शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment