सहा वर्षांच्या चिमुरड्यांनी जपले रोजाचे व्रत; सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव

*राजेंद्र बुवा -दै.ग्रामीण व्यथा*
​नंदुरबार: लहान वय हे खेळण्या-बागडण्याचे असते, मात्र नंदुरबारमधील दोन चिमुरड्या मुलींनी या वयात एक मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. अवघ्या ६ वर्षांच्या अरीबा दानिश अहमद बागवान आणि कशफ अश्फाक शेख या दोन मुलींनी दोन दिवस कडक रोजा (उपवास) पाळून अल्लाहची इबादत केली. त्यांच्या या जिद्दीचे आणि धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे​.भक्ती आणि संयमाचा अनोखा संगम, ​ज्या वयात मुले खेळण्यांमध्ये दंग असतात, त्या वयात अरीबा आणि कशफ यांनी दिवसभर अन्न-पाण्याचा त्याग करून पूर्ण सबुरीने रोजा पाळला. केवळ उपवासच नाही, तर त्यांनी पाचही वेळेची नमाज अदा करून धार्मिक शिस्त पाळली. इस्लाममध्ये रोजा म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे, तर तो संयम, कृतज्ञता आणि सत्कर्माच्या मार्गावर चालण्याची शिकवण देतो. या चिमुरड्यांनी लहान वयातच ही शिकवण आत्मसात करून समाजाला  'इबादत'ची ओढ बालपणापासूनच असावी, असा संदेश दिला आहे.
​सामाजिक संस्थेकडून गौरव
​या दोन्ही मुलींच्या कौतुकासाठी 'इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन' या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एजाज भाई बागवान यांनी दोन्ही मुलींचे पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच त्यांना रोख पारितोषिक आणि सायंकाळी रोजा सोडण्यासाठी (इफ्तार) मिठाईचे बॉक्स देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दुवा केली.
​यावेळी जनसेवा महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा रुकसाना बागवान, सामाजिक कार्यकर्ते सैयद मकसूद, इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे सचिव दानिश अहमद बागवान, सामाजिक कार्यकर्त्या हलीमा अश्फाक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
​या चिमुरड्यांच्या प्रयत्नांनी येणाऱ्या पिढीसमोर एक प्रेरणा उभी केली असून, संपूर्ण परिसरात त्यांच्या कौतुकाची चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा