अग्निदिव्य कथासंग्रहाचे रविवारी प्रकाशन प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्काराचे वितरण

लोणी प्रवरा (प्रतिनिधी):  *एच के तथा हिराचंद ब्राह्मणे सर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त "अग्निदिव्य कथासंग्रह प्रकाशन" गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व साहित्यिक पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी ११/३० वा. माजी आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.* अशी माहिती संयोजक तथा राहाता पं. स.चे माजी सदस्य संतोष ब्राह्मणे यांनी दिली. 
     यावेळी होणाऱ्या समारंभास शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, दैनिक सार्वमत चे वृत्त संपादक अशोकराव गाडेकर,ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, विस्तार अधिकारी अशोकराव विटनोर, शिक्षक नेते कैलास शिंदे, कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
    भिमाई प्रतिष्ठान व साम्य साधना संघ यांच्या वतीने लोणी प्रवरा परिसरातील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राहाता तालुका शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शशिकांत शिंदे यांना एच.के.तथा प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, एच.के.ब्राह्मणे स्मृती जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ शिक्षक जी.ए.पठाण सर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी तर के. डी.सातपुते साहेब स्मृती जीवनगौरव पुरस्कार श्री.भास्कर साळवे तथा कमलवीर प्रज्ञारत्न यांना त्यांच्या सामाजिक प्रबोधन कार्यासाठी देण्यात येणार आहे. अशी माहिती शब्दगंध चे राहाता तालुकाध्यक्ष साहेबराव तुपे यांनी दिली. 
    या कार्यक्रमास परिसरातील साहित्यिक,साहित्य रसिक तसेच हिराचंद ब्राह्मणे सरांच्या सर्व विद्यार्थी वर्गाने उपस्थित रहावे, असे आवाहन संतोष ब्राह्मणे, सुमेध ब्राह्मणे, प्रा. डॉ.संदीप तपासे, सुयश वाघमारे ,विजय तांबे ,गिरीश सोनार, डॉ. नवनाथ शिंदे, सोपानराव विखे,भास्कर दादा लगड , भिमाई प्रतिष्ठान व सम्यक साधना संघ यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा