ईस्माईल दगू फाऊंडेशन तर्फे हज यात्रेकरुंचा सत्कार

नंदुरबार(प्रतिनिधी)-येथील ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे पवित्र हज उमरा मक्का मदिना यात्रेस जाणार्‍या हज यात्रेकरुंचा सत्कार करण्यात आला. यावेळी नंदुरबार येथून दहा हज यात्रेकरु मक्का मदिनासाठी रवाना झाले.
यावेळी सर्व यात्रेकरुंचा शाल, पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सुखरुप यात्रेसाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या. यात्रेकरुंमध्ये सैय्यद मकसुद, रऊफ शाह, गुलाम दस्तगीर, सैय्यद साहील, सलीम शेख, सैय्यद शकीला, फरजाना शाह, मुमताज बानो, नसीम शेख, परवीन बानो यांचा समावेश आहे.
यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान म्हणाले की, इस्माल धर्माचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांनी मानवता, दया, प्रेम शांतीचा संदेश दिलेला आहे, असे पवित्र ठिकाणी व मक्का मदिना असे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी यावेळी दर्शन होते. व आपली धार्मिक विधी, भक्ती, उपासना, आराधना करुन या पवित्र ठिकाणी भाविक प्रार्थना करतात. यावेळी पवित्र हज उमराचा प्रवास सुखरुप व्हावा व नंदुरबार जिल्ह्यात शांती व भाईचारा कायम रहावा, यासाठी प्रार्थना करण्यात यावी, असे सांगितले. यावेळी निशाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप सोनवणे, सामाजिक न्याय व हक्क परिषदेचे अध्यक्ष अरुण रामराजे, पत्रकार राजेंद्रकुमार बुवा, शकील खतिब, ओबीसी ऑर्गनायझेशनचे शहर उपाध्यक्ष अजिम बागवान, तैय्यबा शेख, आप्पा वाघ, युसुफ शेख, कामिल शेख, सादीक शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा