भूषण शिरसाठ ची जयपूर मध्ये चमकदार कामगिरी !

शौकतभाई शेख / श्रीरामपूर 
मनामध्ये परिश्रम आणी काही तरी करुन दाखविण्याची जिद्द असल्यास नक्कीच यशाचं शिखर गाठता येते हे देसवंडी ( ता.राहुरी ) येथील इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या चि. भुषण शिरसाठ याने आपल्या कर्तबगारीतून दाखवून दिले.
सविस्तर असे की, राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेत देसवंडी (ता. राहुरी) येथील नववीत शिकणाऱ्या भूषण ज्ञानेश्वर शिरसाठ याने अष्टपैलू कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे देसवंडी गावच्या आणि शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट राजस्थानमधील जयपूर याठिकाणी आपल्या कौशल्याची मोहोर उमटवली आहे.
​भूषण हा देसवंडी (ता.राहुरी जि.अहिल्यानगर ) येथील स्थानिक शाळेत इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असून नाशिक येथील क्रिकेट प्रशिक्षकांकडे तो सध्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या खेळात कमालीची सुधारणा केली, ज्याचा प्रत्यय जयपूरमधील मैदानावर आला. 
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये भूषणने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघाला उपविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
*​पालकांचा खंबीर पाठिंबा*
भूषणचे वडील श्री. ज्ञानेश्वर भाऊसाहेब शिरसाठ (माऊली फोटोग्राफर) आणि त्याच्या मातोश्रींनी आपल्या मुलाच्या खेळातील प्रगती ओळखून, कुठलाही संकोच न बाळगता त्याला लांबच्या प्रवासासाठी आणि स्पर्धेसाठी जयपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील पालकांनी खेळाप्रती दाखवलेला हा सकारात्मक दृष्टिकोन भूषणच्या यशासाठी मैलाचा दगड ठरला आहे.
​भूषणच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे गावातील तरुण खेळाडूंना नवी उभारी मिळाली आहे. भविष्यात भारतीय संघात खेळण्याचे भूषणचे स्वप्न असून, त्यासाठी तो कसून सराव करत आहे.
​"ग्रामीण भागातील मातीतील खेळाडू जेव्हा परराज्यात जाऊन आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव मोठे करतात, तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो. भूषणचे हे यश कौतुकास्पद असून त्याच्या पुढील भावी वाटचालीस अनेकांनी माझ्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
*वृत्त विशेष सहयोग*
 मेजर बाबासाहेब तेलोरे -
अहिल्यानगर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा