छोट्या शहरातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना आता मोठ्या शहरांमध्ये बाजारपेठ मिळु शकते, त्यासाठी बचत गटांनी आपल्या उत्पादित मालाला शासनाने सुचवलेला सोंनचिरय्या ब्रँड द्यावा व बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, नगराध्यक्ष सत्यजीत कदम

देवळालीप्रवरा :देवळालीप्रवरा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची विक्री व प्रदर्शन चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते,यावेळी मुख्याधिकारी नेहा भोसले (IAS), उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, सभापती सचिन दूस,सौ.नंदा बनकर, सौ.उर्मिला शेटे, नगरसेवक प्रकाश संसारे,बाळासाहेब खुरुद,नगरसेविका सौ.संगीता चव्हाण, सौ.अंजली कदम, सौ.सुजाता कदम,सौ.बेबीताई मुसमाडे, सौ.प्रितिताई कदम, मुख्याधिकारी अजित निकत इ मान्यवर उपस्थित होते.
         पुढे बोलताना नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले कि, 'देवळाली प्रवरा मध्ये २५० बचत गटांच्या माध्यमातून २५०० महिलांचे सक्षम संघटन उभे राहिलेले आहे, मागील काही वर्षांपासून महिला सक्षमीकरण साठी प्रयत्न करण्यात येत असुन इतर शहरातील बचत गटांचे काम दाखविण्यासाठी सहलीचे आयोजनही  केले होते,त्याचा फायदा आज दिसुन येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे,'
        यावेळी माझी वसुंधरा योजना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या निबंध, चित्रकला,भेटकार्ड स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
      महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनास परिसरातील नागरिकांनी भेट देऊन बचत गटांचा उत्साह वाढवावा,असे आवाहन मुख्याधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे,
        या प्रदर्शनामध्ये दिवाळीचे फराळ, ज्वेलरी,लेदर बेग व पर्स,कुरडई, पापड, कपडे,स्टेशनरी,पणती,फुले,लायटिंगच्या माळा विक्रीसाठी आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केले.समुदाय संघटिका सविता हारदे यांनी आभार मानले,
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्रचे महेश आबुज,क्षेत्रीय समन्वयक वंदना आल्हाट,वैष्णवी खरात,हिना शेख, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी बंशी वाळके,अमोल दातीर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा