शब्दगंधच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी कैलास कांबळे,कार्याध्यक्ष सौ.जयश्री झरेकर

राहुरी / अहमदनगर : “ शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.कैलास कांबळे,कार्याध्यक्षपदी प्राथमिक शिक्षिका सौ.जयश्री झरेकर – इंगळे तर सचिवपदी बाळासाहेब मन्तोडे यांची निवड करण्यात आली" असल्याची माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.                              शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष सुभाष सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या सभेत राहुरी तालुका शाखा कार्यकारिणी निवडण्यात आली,यावेळी शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी,खजिनदार भगवान राऊत,किशोर डोंगरे,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मिराबक्ष शेख,राज्य प्रतिनिधी डॉ.महावीरसिंग चोहान इ मान्यवर उपस्थित होते.कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे                               अध्यक्ष - प्रा.डॉ.कैलास कांबळे,कार्याध्यक्ष - सौ.जयश्री झरेकर – इंगळे, उपाध्यक्ष - विकास गभाले, सौ.मनीषा गोसावी,सचिव - बाळासाहेब मन्तोडे,सहसचिव - प्रशांत सूर्यवंशी,खजिनदार - शर्मिला रणधीर, कार्यकारणी सदस्य - श्रीमती सुलोचना गाडेकर,अतुल गोसावी,प्रभाकर मकासरे,क्रांती करंजीकर,स्वाती जोशी, प्रतिभा बोबे,ज्ञानेश्वर बनसोडे,प्रसिद्धी समन्वयक बाळकृष्ण भोसले,सल्लागार भाऊसाहेब साबळे यांची निवड करण्यात आली. 
        राहुरी तालुक्यातील नवोदित साहित्यिकांना एकत्र करून विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतील असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.डॉ.कैलास कांबळे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा