राष्ट्रीय शिक्षण दिन आणि मौलाना अबुलकलाम आझाद यांची जयंती आज आमच्या नगरपालिका शाळा क्रमांक 5, श्रीरामपूर मध्ये अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली .यानिमित्ताने इयत्ता पहिलीतील नवागतांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री ज्ञानेश्वर पटारे साहेब तसेच पंचायत समितीचे विषयतज्ञ शाहीन अहमद शेख व NAS निरीक्षक गुलजारा बागवान मॅडम उपस्थित होते.याप्रसंगी मा श्री पटारे साहेब यांनी मौलाना आझाद यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देत त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग वर्णन केले तसेच शाळा क्रमांक पाच जिल्ह्यातील नगरपालिका विभागातील एक नावाजलेली शाळा असून या शाळेचा शिक्षण मंडळाला अभिमान आहे असे आवर्जून सांगितले. यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याने मौलाना आजाद यांच्या जीवन चरित्राचा परिचय करून देणारी भाषणे केली . शाळेच्या पहिल्या दिवशी आज शाळेमध्ये 75% उपस्थिती होती. सर्व शिक्षक उपस्थित होते.
Post a Comment