जिल्हा परिषद प्राथमिक सेमीइंग्लिश श्रीगोंदा उर्दू शाळेत स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची 133 वी जयंती व राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा

आज दिनांक ११/११/२०२१ रोजी श्रीगोंदा उर्दू शाळेत सकाळी १०.३० वाजता परिपाठ सुरू होते या वेळी अचानक श्रीगोंदा केंद्राचे प्रमुख गजानन ढवळे (साहेब) यांनी भेट दिली व स्वतः परिपाठ मध्ये सहभाग घेतले या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी इंग्रजी मध्ये pledge(प्रतिज्ञा) घेत होते साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
जिल्हा परिषद प्राथमिक सेमीइंग्लिश श्रीगोंदा उर्दू शाळेत स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची 133 वी जयंती व राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करण्यात आला. या निमित्त विस्तार अधिकारी श्री. एस.एम ढवळे साहेब व गजानन ढवळे साहेबांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले व शाळेतील (परस बाग) ची पाहणी केली या वेळी शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा