गुरू रविदास साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी शब्दगंध चे सुभाष सोनवणे यांची निवड

अहमदनगर : हातगाव जि नांदेड येथे होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षपदी शब्दगंध चे उपाध्यक्ष कवी सुभाष सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
        सुभाष सोनवणे 
हे सेवानिवृत-पोलीस अधिकारी असुन      अध्यक्ष साहित्यिक विभाग महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास संघ, उपाध्यक्ष  म्हणून शब्दगंध साहित्यिक परिषद  उपाध्यक्ष 
निसर्ग मित्र समिती मध्ये कार्यरत आहेत.
        त्यांचे "व्यथीत सावल्या व  स्नेहबंध हे पुस्तकं प्रसिद्ध असुन 
ते वृत्तपत्र मध्ये कथा, कवीता व विविध विषयवर  लेख लिहितात,त्यांनी 
*"जयहिंद"*
*"मुसंडी"* चित्रपट व 
*"इनमीन साडेतीन"* 
"आशा अभिलाशा" या मराठी मालीकामध्ये  भूमिका केल्या आहेत, आकाशवाणी च्या  पुणे,अ.नगर केंद्रावर
काव्यसादरीकरण व मुलाखती प्रसारित आहेत, 
यापूर्वी त्याना  *"महात्मा फुले फेलोशीप"* "विर-भारती,काव्ययात्री पुरस्कर,कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार
,समाजभुषन यासह १७ पुरस्कार मिळाले आहेत,
       साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे,भगवान राऊत,ज्ञानदेव पांडुळे, डॉ अशोक कानडे,शर्मिला गोसावी, चर्मकार संघाचे संजय खामकर,प्रबोधनकार भाऊ थोरात यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा