अहमदनगर : माणसां माणसातील मतभेद कमी होऊन एकसंघ समाज निर्माण होण्यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्वपूर्ण असुन त्यासाठी शब्दगंध च्या सभासदांना साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात अधिक कार्यरत होण्यासाठी पाठबळ देण्यात येत आहे असे मत शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य ची त्रेवार्षिक सर्वसाधारण सभा कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती,त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. विचारपीठावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ऍड.कॉ.सुभाष लांडे पाटील,संस्थापक सुनील गोसावी,ज्ञानदेव पांडुळे मामा,भगवान राऊत,शर्मिला गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
या सभेमध्ये मागील इतिवृतास मंजुरी देऊन दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,शब्दगंध च्या पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन करण्यात आले,वार्षिक अंदाजपत्रक तयार करून मंजुरी देण्यात आली,जमा खर्चास व नवीन सभासदांना मंजुरी देण्यात आली,
संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी वार्षिक अहवाल वाचन केले,यावेळी शब्दगंध च्या कोपरगाव,राहुरी,पाथर्डी,शेवंगाव, नेवासा, श्रीरामपूर शाखांना मंजुरी देण्यात आली, मागील तीन वर्षांच्या जमाखर्च चे वाचन करण्यात आले,
पुढील तीन वर्षाकरिता कार्यकारी मंडळ सदस्यांची निवड करण्यात आली,यावेळी डॉ.श्याम शिंदे,डॉ.अशोक कानडे,क्रांती करंजगीकर, पी.एन.डफळ,सुभाष सोनवणे,भगवान राऊत,डॉ.सुनीलकुमार धस,डॉ.तुकाराम गोंदकर,राजेंद्र फंड,राजेंद्र उदागे,हरिभाऊ नजन,शर्मिला व सुनील गोसावी यांचा बबनराव गिरी यांचे वळणवाटा हे पुस्तकं भेट देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी सुभाष सोनवणे,सुनीलकुमार धस, शहाराम आगळे,डॉ.अशोक कानडे,भाऊसाहेब सावंत,भगवान राऊत व शर्मिला गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले.शब्दगंध साहित्य संमेलन, विविध पुरस्कार समित्या,भविष्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात आले, शाहिर भारत गाडेकर यांच्या क्रांतीगीताने सभेस सुरुवात झाली तर शाहिर वसंत डंबाळे यांच्या गीताने समारोप झाला,
यावेळी प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर,मारुती सावंत,रामकिसन माने,प्रा.डॉ.बापू चंदनशिवे,तात्याराम राऊत,कृष्णकांत लोणे,निखिल गिरी आदी उपस्थित होते.
إرسال تعليق