येथील फातेमा हौसिंग सोसायटी येथे अजहरभाई शेख उर्फ एबीएस मित्र मंडळ यांच्या वतीने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जन्मोत्सव ‘ईद ए मिलाद‘ निमित्त भंडाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अजहर शेख यांच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्व धर्माचे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केले जाते. या सणानिमित्त श्रीरामपूर जामा मशीदीचे मौलाना मो.इमदादअली साहब व हाजी अन्वरभाई कादरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडाराच्या दुवाने प्रारंभ करण्यात आला.
यावेळी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, तौफिक शेख, साजिद मिर्झा, शाहीद कुरेशी, सलीम जहागीरदार,आदिल मखदुमी, जयेश सावंत, अस्लम बिनसाद, इम्रान शेख, इरफान शेख, अमजद बाबा, ऋषी गडाख, अतुल गडाख, अभिषेक गुलदगड आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच परिसरातील नागरिकांनी देखील एबीएस यांचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘ईद ए मिलाद‘ निमित्त भंडाराचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अझरभाई शेख मित्र मंडळाचे अजीम शेख, शादाब पठाण, तल्हा शेख, इरफान शेख, अफ्फान कुरेशी, रोहन आढाव, मुशरफ सय्यद, मोहीज पठाण, नईम शेख, ॲड. अस्लम शेख, आवेज शेख, फैजान बागवान, परवेज शेख, साहिल तांबोळी, फरदीन शेख, फैजान कुरेशी, सलमान पठाण, अल्ताफ शेख, दय्यान काकर, अकिब शेख, इकबाल काकर, अल्त्मश शेख, बिलाल काकर, तौफिक पठाण, सोहेल काकर, कैफ जुनानी, इरफान कुरेशी, राकेश थोरात, आसिफ मुर्तुजा, अलबक्ष शेख, रेहान बागवान, आरबाज शहा, कार्तिक रेड्डी, जमीर पिंजारी, साजीद शहा, जीशान सय्यद, जुनेद बिल्डर, सलमान शेख आदिने परिश्रम घेतले.
إرسال تعليق