काजल शिंगलावर एफआयआर पण आयोजकांवर कारवाई कधी ? माकपचा प्रशासनाला सवाल

 


▫️मख़दुम समाचार▫️ 
मुंबई (प्रतिनिधी) २७.४.२०२३
   येथील मीरारोड एसके स्टोन मैदानावर दि. १२ मार्च रोजी आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या सार्वजनिक मेळाव्यात मीरा-भाईंदरच्या मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदाया विरुद्ध गुजरातच्या काजल शिंगला उर्फ हिंदुस्थानी यांनी द्वेषयुक्त भाषण केले. भाषणात काजल हिने मीरा रोडला अमली पदार्थांचा अड्डा, मुस्लिम फेरीवाले नपुंसकतेची औषधे मिसळून वस्तु विकत असल्याचा दावा तसेच येथे लव जिहाद व लँड जिहाद सुरू असल्याचा आरोप केला होता. चादरवाला व फादरवाला शब्द वापरुन तिने मुस्लीम व ख्रिस्ती अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले. या प्रक्षोभक मोर्चा व भाषणामुळे मीरा-भाईंदर परिसरात संतापाची लाट उसळली. द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्यांवर तसेच 'जन आक्रोश मोर्चा'च्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सादिक बाशाआपचे सुखदेव बनबंसी आणि शिवसेनेचे सॅबी फर्नांडिस आदींच्या नेतृत्वात पोलिस आयुक्तांना भेटून केली गेली.
    मीरा भाईंदर परिसरात शांतता व जातीय एकात्मता भंग करणारे भाषण देणार्‍या काजल हिच्यावर स्थानिक पोलिसांनी भादंविच्या कलम १५३ (आणि ५०५(२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याचे माकपकडून स्वागत करण्यात आल परंतु शिवप्रतिष्ठानहिंदू राष्ट्र सेना आणि सनातन संस्था यासारख्या अनेक संघटनांनी एकत्र येत सकल हिंदू समाज नावाच्या बॅनरखाली राज्यभरात भडकाऊ मोर्चे काढले. या सर्व मोर्च्यांना भाजप नेत्यांचा भरपूर सहभाग आणि पाठिंबा राहिला मात्र आयोजकांवर आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.
    म्हणून आयोजक संघटना, भाजपा आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, ज्येष्ठ नगरसेवक रवी व्यास आणि मनसे नेते सानिप राणे, शैलेश  पांडे यांच्यावर देखील गुन्हा नोंद करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
   मागणीपत्रावर डीवायएफआयहक हैंनिर्भय भारतमीरा-भाईंदर विकास मंडळजिद्दी मराठाऑल इंडिया लॉंयर्स यूनियनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षएमबीपीएसपहल फाउंडेशन, तिरछी आंख साप्ताहिक या संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक नागरिकांची सह्या आहेत, अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी सादिक बाशा, मोईन अन्सार यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा