◽ मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (प्रतिनिधी) २७.४.२०२३
आपल्या छत्रपतीपदाचा व अधिकाराचा वापर उपेक्षित व वंचिताना न्याय देण्यासाठी व माणूस म्हणून समाज मान्यता मिळवून देण्यासाठी केला व प्रसंगी प्रस्थापित धर्म व्यवस्थेविरुद्ध बंड केले असे प्रतिपादन शाहू चरित्र अभ्यासक डॉ.मंजुश्री पवार यांनी केले, समाजशास्त्र मंडळ आयोजित कार्यक्रमात न्यू आर्ट्स महाविद्यालयात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भास्कर झावरे होते. पुणे विद्यापीठ समजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रुती तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. पवार यांनी शाहूराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगाची मांडणी करत, शाहू महाराज राजा असताना अतिशय वंचित उपेक्षित वर्गाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केले हे भारतातील कोणत्याही समकालीन राजाने हे कार्य केले नाही तर ते शाहू महाराजांनी केले म्हणून त्यांचे व्यक्तित्व स्मरणीय ठरले, असे त्या यावेळी म्हणाल्या. शाहू महाराजांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग एक राजा म्हणून नव्हे तर ते समाज क्रांतिकारक होते यातून आजही प्रेरणा मिळते ते फक्त इतिहासाच्या पानातील राजे नाहीत तर आज ही समजाचे प्रेरणास्थान आहेत.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांनी विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराजाच्या चरित्राचा अभ्यास करून आजच्या काळातील समाजिक प्रश्नांची उत्तरे व उपाय शोधावेत. आजच्या अनेक गंभीर समस्याची उत्तरे शाहू चरित्रातून मिळतील, असे मनोगत व्यक्त केले.
उपप्राचार्य डॉ.बी.बी.सागडे, समाजशास्त्र मंडळाचे डॉ. किसन अंबाडे, डॉ.अमन बगाडे, डॉ.पी.टी. शेळके, प्रा.प्राजक्ता ठुबे, डॉ. मिना साळे, डॉ.होळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसचालन प्रा.गणेश निमसे यांनी तर आभार डॉ. नागेश शेळके यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment