भगवान महावीर चषक स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना हक्काचे व्यासपीठ निर्माण - धनेश कोठारी !


▫️मख़दुम समाचार▫️

अहमदनगर (लहू दळवी) ७.५.२०२३

 शहरामध्ये भगवान महावीर चषक परिवाराने क्रिकेट खेळाच्या माध्यमातून लावलेल्या छोट्याश्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. गेली तेरा वर्षामध्ये भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना खेळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडत आहे. समाजातील युवक एकत्र येऊन आपल्या विचाराची देवाण-घेवाण करत असतात. ही स्पर्धा खेळीमेळीच्या व आनंददायी वातावरणात पार पडत आहे. सांघिक खेळामुळे एकोपा निर्माण  होण्याचे  काम होत असते स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जातो. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना क्रिडा खेळाकडे वळविणे गरजेचे आहे, विविध क्रिडा स्पर्धेमध्ये युवकांना करियर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तरी युवकांनी क्रिडा क्षेत्राकडे वळावे असे प्रतिपादन धनेश कोठारी यांनी केले. 

वाडिया पार्क येथे सुरु असलेल्या भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचे वितरण करताना बडीसाजन ओस्तवाल युवक संघ, जैन ओस्तवाल युवक संघ यांच्या वतीने करण्यात आले यावेळी धनेश कोठारी, आशिष देसरडा, अजय बोरा, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा, प्रफुल्ल मुथा, व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ताथेड, अतुल शेटिया, अजय कांबळे, राहुल शिंदे, अजय गुगळे, किरण पोखरणा, अनिल दुग्गड, पारस शेटिया, प्रितम पोखरणा, आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संजय चोपडा म्हणाले की, गेल्या १५ दिवसांपासून वाडिया पार्क मैदानावर भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना नवरंग इलेव्हन विरुद्ध श्रीबन वॉरियर्स यांच्यामध्ये रंगणार असून अहमदनगरकरांनी क्रिकेट खेळाचा आनंद घ्यावा, असे ते म्हणाले.





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा