◽ मख़दुम समाचार ◽
नेवासा (कार्तिक पासलकर) ७.५.२०२३
तालुक्यातील चांदा - बऱ्हाणपूर रस्त्याचे काम संथ गतीने होत होते. बऱ्याच दिवसापासून रस्त्यावर मोठी खडी टाकून काम थांबलेले होते. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मोठ्यी खडीमुळे गाड्यांचे नुकसान होत होते. वाहने खराब होऊन लोकांना आर्थिक फटका बसत होता. खड्ड्यांमुळे येथे छोटेमोठे अपघात होत होते. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, सामान्य नागरिकांना खडीयुक्त खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत होता.
परिसरातील लोकांच्या या सर्व अडचणी समजून घेत भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक ओंकार बडाख पाटील आणि राहुल काळूगे यांनी सहकाऱ्यांसह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी पाठपुरावा केला. नेवासा ऑफिसला भेट देवुन संबंधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. जेणेकरून नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही व दिलासा मिळेल.
अधिकाऱ्यांनी मागणीची दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात केली. दोन दिवसात रस्त्यावरील खड्ड्यावर डांबरीकरण करून काम पूर्ण केले. भारत राष्ट्र समितीच्यी वतीने अधिकाऱ्यांना धन्यवाद देण्यात आले तसेच उर्वरीत रस्त्याचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली.
◾
हे हि वाचा : माधुरी दीक्षित : Beauty with Brain कालातीत सौंदर्याची सम्राज्ञी. 'कलावार्ता'मधील गुरुदत्त वाकदेकरांचा लेख
Post a Comment