▫️मख़दुम समाचार▫️
नेवासा (कार्तिक पासलकर) ३.५.२०२३
तालुक्यातील चांदा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रातील रुग्णवाहिकेमध्ये बेसिक सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी रुग्णांची तातडीच्या वेळी गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्याधिकारी डॉ. सुधीर पुंड यांना बेसिक सुविधा जसे ऑक्सिजन, वाहनातील इंधन तसेच इतर लाईफसेव्हिंग सुविधांची मागणी केली आहे.
यावेळी डॉ.सुधीर पुंड यांनी तात्काळ कारवाई करून पुढील पंधरा दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी किरण थोरात,सागर दिवटे, सागर जावळे, रावसाहेब राशींकर, राहुल दहातोंडे, सोमनाथ भालके आदी उपस्थित होते.
Post a Comment