▫️मख़दुम समाचार▫️
अहमदनगर (साई सुरम) १२.६.२०२३
सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या टी. वाय. बी.सी.ए. परीक्षेत अहमदनगर महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स बी.सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी चांगलेच यश संपादन केले. यामध्ये प्रथम क्रमांक अंकित बोरुडे, द्वितीय दीपक उमाप, तृतीय क्रमांक आशिष वेनन यांना मिळाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेचे चेअरमन व स्पायसर ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. संजीवन आरसूड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस, उपप्राचार्य डॉ. सय्यद रज्जाक, उपप्राचार्य डॉ. नोवेल पारगे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस म्हणाले की, शिक्षण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शिक्षण आणि ज्ञान केवळ वैयक्तिक विकासासाठी आवश्यक नाही, तर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी देखील आवश्यक आहे. शिक्षण एखाद्या व्यक्तीला विचार करण्याची, कृती करण्याची आणि जीवनात आपला विकास करण्याची संधी देते, त्यामुळेच विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे शिक्षण आणि विविध नवनवीन शिक्षण पद्धतीचे शिक्षण देण्याचा महाविद्यालयचा प्रयत्न असतो. त्याचमुळे अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात. भविष्यातही विद्यार्थी या शिक्षणाच्या जोरावर महाविद्यालयाचे आणि आपल्या कुटुंबाचे व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवतील, असे ते म्हणाले.
यावेळी भा.पां.हि. संस्थेचे चेअरमन म्हणाले की, विद्यार्थ्यांचा भविष्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अहमदनगर महाविद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षण दिल्यामुळेच आज आपले विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादन करत आहे. कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात चांगले प्लेसमेंट महाविद्यालयाच्या माध्यमातून मिळते आणि नोकरी मिळवण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होत नाही, त्यामुळे महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा शिक्षण घेण्यासाठी कल असतो, हीच अहमदनगर महाविद्यालयाची ओळख देश पातळीवर दिसून येते असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
◾
Post a Comment