▫️मख़दुम समाचार▫️
अहमदनगर (प्रसाद शिंदे) ११.६.२०२३
प्रत्येकजण आपल्या नोकरी, व्यवसायात व्यस्त असतो, परंतु सामाजिक दायित्व जपत जालिंदर बोरुडे यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. आपली नोकरी सांभाळत त्यांनी आरोग्य क्षेत्रात चांगले काम उभे केले आहे. नोकरीमध्ये अनेक वर्षे आपली प्रामाणिक सेवा करुन स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचप्रमाणे सहकारी कर्मचार्यांसह प्रत्येकांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध ठेवत प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणून ते सुपरिचित आहेत. आज सेवानिवृत्त झाले असले तरी आत पूर्णवेळ सामाजिक कार्यात ते स्वत:ला झोकून देतील. त्यांच्या कार्यात आमचेही सहकार्य असेल, असे प्रतिपादन माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर यांनी केले.
माळी महासंघाच्यावतीने सेवापुर्ती निमित्त जालिंदर बोरूडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समता परिषदेचे महानगराध्यक्ष दत्ताभाऊ जाधव, माजी नगरसेवक धनंजय जाधव, केमिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ गाडळकर, माळी महासंघ जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष नंदकुमार नेमाने, शहरजिल्हाध्यक्ष नितीन डागवाले, कर्मचारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तुषार फुलारी, अभियंता आघाडी जिल्हाध्यक्ष मंगेश दरवडे, कर्मचारी आघाडी शहरअध्यक्ष राहुल साबळे, कार्याध्यक्ष गणेश धाडगे, शहर उपाध्यक्ष विवेक फुलसौंदर, संपर्क प्रमुख यश भांबरकर आदि उपस्थित होते.
यावेळी नितीन डागवाले म्हणाले, जालिंदर बोरुडे यांनी सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनिय आहे. आपली नोकरी सांभाळून सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीय सहभाग राहीला आहे. सेवानिवृत्तही नंतरही त्यांचे कार्य निरंतर सुरु राहील, असे सांगून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. सत्कारास उत्तर देतांना जालिंदर बोरुडे म्हणाले, नोकरी व सामाजिकतेचा समन्वय साधत कार्य सुरु ठेवले. या कार्यात अनेकांचा सहभाग नेहमीच मिळत असल्याने हे कार्य बहरत आहे. समाजसेवेचे व्रत जपत हे कार्य यापुढेही असेच सुरु राहील. आज नोकरीतून सेवापुर्ती झाली असली, तरी सामाजिक कार्यात आपण कायम कार्यरत राहू. आपल्या भावी कार्यास दिलेल्या शुभेच्छा प्रेरणादायी राहील, असे सांगितले. यावेळी नंदकुमार नेमाणे, तुषार फुलारी आदिंनीही मनोगतातून जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचा गौरव केला. शेवटी यश भांबरकर यांनी सर्वांचे आभार मानले.
Post a Comment