मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २८.६.२०२३
जिल्ह्यात धर्म परिवर्तनाचे काम जोरात चालू असुन दलित समाजाला पैशाचे अमिष दाखवुन त्यांच्या गरिबीचा फायदा घेवुन त्यांना धर्मपरिवर्तन करण्यास सांगतात, वेळ पडली तर बळजबरी करतात. अशा भुलथापांना बळी पडुन अनेक मागासवर्गीय समाज इतर समाजात दाखल झाले आहेत. परंतु मागासवर्गीय समाजाला मिळणारे शासनाच्या सुविधांचा सर्रास फायदा घेत आहेत, असे करून हे लोक एक प्रकारे शासनाची फसवणुक करत असून. त्यामुळे इतर तळागळातील मागासवर्गीय लोकांपर्यंत सुविधांचा लाभ पोहोचत नाही. जसे शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, नोकरीमध्ये सवलत, निवडणुकीमध्ये आरक्षण, पिवळे रेशनकार्ड, धान्य, ॲट्रॉसिटी या सर्व सुविधाचा इतर समाज फायदा घेत आहे.
तरी सर्व अहमदनगर जिल्ह्यातील धर्मपरिवर्तन झालेल्या मागासवर्गीय कुटुंबाची नोंद इतर धर्मामध्ये झालेली असून या बाबीची चौकशी करून मागासवर्गीयांना मिळणारी सुविधा बंद करण्यात यावी. जर यापुढे इतर धर्मातील कोणी मागासवर्गीय सुविधांचा फायदा घेत असल्यास त्यांच्यावर शासनाची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे मागणी करण्यात आली.
यावेळी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील समवेत जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, जिल्हा संपर्कप्रमुख कडूबाबा लोंढे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत सकट, जिल्हाउपाध्यक्ष मनोज घाडगे, बबन डोंगरे, सुलोचना बहिरट, वृषाली डोंगरे, भाऊसाहेब लामखडे, रंगनाथ वायदंडे, संपत गुंड आदी उपस्थित होते.
लवकरात लवकर जिल्ह्यातील सर्व समाजाची यादी तयार करुन त्यांच्या सर्व सुविधा बंद करण्यात याव्यात, अन्यथा दलित महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
Post a Comment