मख़दूम समाचार
पुणे (प्रतिनिधी) २.८.२०२३
येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेले भाषण वाचकांसाठी देत आहोत.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार, टिळक स्वराज्य संघ आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक तसेच उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर व बंधू भगिनींनो,
आजचा दिवस हा लोकमान्यांच्या १०३ व्या पुण्यतिथीचा आहे. आणि त्याचा सोहळा ऐतिहासिक पुणे शहरामध्ये होत आहे. मैं प्रधानमंत्रीजी को कहना चाहता हूँ, इस देशमे पुणे शहर का एक अलग महत्त्व हैं | छत्रपती शिवाजी महाराज और इनका इतिहास पूरी दुनिया जानती हैं | शिवाजी महाराजजी का जन्म इस ही जिलमे शिवनेरी के किल्ले में हुआ | और इस ही पुणे शहर के लाल महाल मैं उनका बचपन उन्होंने गुझारा. यह उन्होंने हिंदवी स्वराज्य के निर्माण के लिये या देशात अनेक राजे-रजवाडे होऊन गेलेत, त्यांचे राज्य, त्यांचे संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जायचे. कुठे देवगिरी यादवांचे संस्थान असेल, कुठे मुघलांचे दिल्लीचे संस्थान असेल. अनेकांची संस्थाने या देशात होऊन गेली पण शिवछत्रपतींचे काम एका वेगळ्याच दिशेने होते. त्यांनी राज्य उभे केले, पण ते भोसल्यांचे राज्य नव्हते, ते हिंदवी स्वराज्य होते, ते रयतेचे राज्य होते. आणि ते रयतेचे राज्य प्रस्थापित करण्याचे काम पुणे शहरातून झाले आणि हा गौरवशाली इतिहासाचा भाग आहे.
अलीकडच्या काळात या देशाने व या देशाच्या जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होते पण, लाल महालात शाहिस्तेखानाने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या देशाचा पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळामध्ये झाला. ही गोष्ट महत्त्वाची विसरू शकत नाही. अनेक गोष्टी याठिकाणी सांगता येतील, आपण लोकमान्यांचे स्मरण करण्यासाठी आलो
१८६५ मध्ये लोकमान्यांचे वडील गंगाधर यांनी रत्नागिरी सोडली व त्यांचे पुण्यामध्ये आगमन झाले. पुण्यामध्ये आगमन झाल्याच्यानंतर ते नुसते आगमन नव्हते तर ती एक प्रकारची चिंगारी होती, संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्यासंबंधिची ती मशाल बनली होती. आणि त्या कालखंडामध्ये लोकमान्यांच्या सुरुवातीचा काळ या पुणे शहरामध्ये गेला. त्यांचे एकंदर लक्ष सर्व परिस्थितीवर होते. आणि ते असताना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचे असेल तर सामान्य माणसाला जागृत केले पाहिजे आणि त्यासाठी एक जबरदस्त अशा प्रकारच्या शस्त्राची निर्मिती करायची आवश्यकता आहे आणि ते शस्त्र म्हणजे पत्रकारिता. टिळकजीने २५ साल के उमर में मराठी भाषा में केसरी अखबार और अंग्रजी में मराठा साप्तहिक शुरु किया | और इन पत्रो के माध्यम से इंग्रजो के खिलाफ उन्होंने कडा प्रहार किया | केसरी का मतलब सिंह या शेर है | केसरी व मराठा द्वारा टिळकांनी एकंदर या देशातील परकीय लोकांवर प्रचंड प्रहार केले आणि एक प्रकारची लोकजागृती करण्याच्या संबंधीचे काम त्यांच्या काळात त्यांनी केले. ते नेहमी म्हणत असत, पत्रकारितेवर कोणाचा दबाव असता कामा नये, त्या दबावातून पत्रकारिता मुक्त झाली पाहिजे आणि ती भूमिका त्यांनी सातत्याने पाळली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म झाला, गठण झाले, याच पुणे शहरामध्ये झाले. त्या काळात पहिले अधिवेशन या पुणे शहरात होणार होते. परंतु प्लेगची साथ याठिकाणी आली आणि त्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोवालिया टँक मैदान म्हणजेच ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून आज त्या ठिकाणी ओळखले जाते. त्याकाळात एकंदर दोन प्रकारचे नेते त्या संघटनेमध्ये होते त्याला मवाळ आणि जहाल म्हणून ओळखले जायचे. आणि या जहालांचे प्रतिनिधित्व हे लोकमान्यांनी केले होते. लोकमान्यांनी “स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो मी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणारच नाही..” ही भूमिका जनमाणसाच्या समोर मांडली.
स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसूत्री आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण स्वराज्याचे आंदोलन हे त्यांच्या काळामध्ये मांडलेले होते. याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला. गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल या सगळ्यामध्ये लोकमान्यांचे योगदान हे फार मोठे होते आणि त्या माध्यमातून एक नवीन इतिहास तयार करण्याचे काम त्यांनी केले. त्या कालखंडामध्ये दोन युग होती, एक टिळक युग व दुसरं महात्मा गांधीचे गांधी युग. याठिकाणी या दोघांचे जे योगदान आहे ते आम्ही कधी विसरू शकत नाही आणि या देशाच्या नव्या पिढीला या कर्तुत्ववान दृष्टीच्या नेत्यांचे आदर्श हा अखंडपणाने प्रेरणा देईल याची मला खात्री आहे आणि या पार्श्वभूमीवर टिळक पुरस्कार याला आगळेवेगळे अशा प्रकारचे महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकाने मोदीजींची निवड या स्मारकाच्यासाठी या पुरस्कारासाठी केली. या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफार खान होते, बाळासाहेब देवरस होते, शंकर दयाळ शर्मा होते, अटलबिहारी वाजपेयी होते, डॉ. मनमोहन सिंग होते अशी अनेक मान्यवरांची नावे या ठिकाणी घेतली जातील आणि या मान्यवरांच्या यादीमध्ये आज नरेंद्र मोदीजींच्या नावाचा आज या ठिकाणी समावेश झाला. याचा आनंद आज आपल्या सर्वांना आहे. आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे याठिकाणी जी निवड झाली त्यांना हा जो पुरस्कार देण्यात येतोय त्याबद्दल त्यांचे अतःकरणापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांची रजा याठिकाणी घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र..!
Post a Comment