संगमनेर (प्रतिनिधी)- साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहिर अमर शेख यांना भारतरत्न पुरस्कार मिळणे बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील बहुजन समाजातील प्रतिभावान व कर्तबगार अशा सुपुत्रांला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात यावे असे एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आसिफ शेख यांनी यावेळी म्हटले, आपल्या सरकारच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्कारासाठी आपण शिफारस करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतल शाहिर अमर शेख यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप महान असे कार्य करून ठेवले, ते लोक चळवळीतील कार्यकर्ते असल्याने निरपेक्ष वृत्तीने काम केले आहे. त्यांनी कधीच पुरस्कार, मानधन व पदांसाठी कधीच काम केले नाही. त्यांनी सामाजिक, राजकीय, कला, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांनी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशात गौरव प्राप्त करून दिला आहे. इतके कार्य एखाद्या प्रस्थापित समाजातील नेत्याने केले असते तर त्याला केव्हाच हा पुरस्कार प्रदान केला असता. परंतू अण्णा भाऊ व अमर शेख यांनी साहित्यातुन आपले परखडपणे मत मांडले होते म्हणून कदाचित त्यांच्या पुरस्कारासाठी राजकारण आडवे आले आहे. जे काम त्यांच्या हयातीत व्हायला पाहिजे हवे होते, ते किमान आपल्या सरकारने मरणोत्तर तरी एका महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करावा. म्हणून आपण त्यांच्या १०३ व्या जयंतीचे औचित्य साधुन त्यांची भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस व पाठपुरावा करावा अशी मागणी मा.नायब तहसिलदार श्रीकांत लोमटे साहेब यांना निवेदनाद्वारे देण्यात आली, याप्रसंगी जेष्ठ सामाजसेवक अब्दुल्हा चौधरी, कारभारी देव्हारे सर, राजुभाई इनामदार, अनिल खर्डे, ज्ञानेश्वर राक्षे, एजाज बिल्डर, आसिफ शेख, जानकिराम भडकवाड, इरफान फिटर, राजु थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment