२०२२ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर* अंतस्थ हुंकार, बेवारस, हंगामी, क्रांती उद्यानाचे तपस्वी, काजवा , साहित्य आणि लोककला : मार्क्स, आंबेडकरी दिशा होरपळ, स्ट्रगलर, चा समावेश

२०२२ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर                                                          अंतस्थ हुंकार, बेवारस, हंगामी, क्रांती उद्यानाचे तपस्वी, काजवा  , साहित्य आणि लोककला : मार्क्स, आंबेडकरी दिशा                              होरपळ, स्ट्रगलर, चा समावेश
अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने २०२२ चे “ राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ” अंतस्थ हुंकार, बेवारस, हंगामी , क्रांती उद्यानाचे तपस्वी , काजवा, साहित्य आणि लोककला: मार्क्स, आंबेडकरी दिशा,प्रिय हा कण गॉड पार्टिकल या पुस्तकांना जाहिर करण्यात येत असून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.

         पुरोगामी विचारांच्या व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणा-या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन,परिसंवाद,चर्चासत्र, कथा-काव्य लेखन स्पर्धा,विविध पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन,बालसंस्कार शिबीर ई उपक्रम राबविण्यात येतात.त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून “ राज्यस्तरीय वाड्मय स्पर्धा ” आयोजित करण्यात येतात.
        अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कवयित्री  शर्मिला गोसावी,प्राचार्य विलास साठे,भगवान राऊत,सुनील धस,स्वाती ठुबे,प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, बाळासाहेब शेंदूरकर यांनी परीक्षक म्हणून निकाल सादर केला.
*२०२२ चे “ राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ”*
(काव्यसंग्रह) अंतस्थ हुंकार - डॉ.शिवाजी शिंदे,सोलापूर,प्रिय हा कण गॉड पार्टिकल आहे - आशा डांगे,संभाजीनगर, (वैचारिक ग्रंथ)साहित्य आणि लोककला: मार्क्स, आंबेडकरी दिशा- डॉ. मिलिंद कसबे, नारायणगावं,(कादंबरी) बेवारस – धनंजय पोटे,चंद्रपूर,(कथासंग्रह) हंगामी – विलास पंचभाई,नाशिक, (लेखसंग्रह) क्रांती उद्याचे तपस्वी – प्रा.वसंत गिरी,मेहकर,(आत्मचरित्र) काजवा – पोपटराव काळे,पुणे (नाटक),डिकाष्टा – डॉ.अनंत कडेठाणकर,संभाजीनगर,(बाल कथासंग्रह) वेणुच्या गोष्टी – विनोद गायकर,मुंबई,(बाल काव्यसंग्रह) गम्माडी झिम्माडी – स्मिता बनकर,नाशिक 
 *२०२२ चे “ जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार*  ”                              (कादंबरी) होरपळ – गिताराम नरवडे,टाकळी खादगाव, (काव्यसंग्रह) रंग आयुष्याचे – स्वाती पुरी,अकोले, (आत्मचरित्र) मी गुरुजी झालो त्याची गोष्ट – राजेंद्र भाग्यवंत,अकोले, (समीक्षा ग्रंथ) मराठी ग्रामीण आई स्वरूप आणि शोध – डॉ.योगिता रांधवणे,सावेडी (व्यंगचित्र) – सासू Vs सुन,अरविंद गाडेकर,संगमनेर,(लेखसंग्रह), स्ट्रगलर – आशिष निनगुरकर,मुंबई                             परीक्षक - शर्मिला गोसावी,हरिभाऊ नजन,डॉ.अनिल पानखडे,बबनराव गिरी,सुभाष सोनवणे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,शाल,बुके व साहित्य संमेलनात सहभाग असे पुरस्काराचे स्वरूप असून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.पुरस्कार विजेत्यांचे स्वागताध्यक्ष आमदार संग्रामभैय्या जगताप, संयोजन समिती चे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा