राज्यात “युवा पर्यटन मंडळाची " स्थापना करणेबाबत.

पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा / कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यालयांमध्ये 7 वी पासून पुढील विद्यार्थ्यांचे "युवा पर्यटन मंडळे" (Youth Tourism Club) स्थापन करण्याचे निर्देश दि. 18/7/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आले आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परिसरातील पर्यटन/वारसा स्थळांबाबत कुतुहल निर्माण होवून जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने “युवा पर्यटन मंडळ' स्थापन करण्यात येणार आहेत. भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडण्यासह विद्यार्थी आणि तरुणांमध्ये संघभावना, व्यवस्थापन नेतृत्व
आणि सेवा अशी विविध कौशल्ये आत्मसात करणे,शाश्वत व जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण होण्यासाठी या मंडळांची मदत होईल.या मंडळांच्या माध्यमातून पर्यटन केंद्रित उपक्रमांच्या आयोजनावर भर देण्यात येणारआहे.
युवा पर्यटन मंडळाच्या सदस्यांनी जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेटी देणे, पर्यटन स्थळांसंबंधी चित्रकला, निबंध स्पर्धांचे आयोजन, पर्यटन स्थळे जोपासणे व संवर्धन करणे तसेच पर्यटनस्थळांवर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान अशा विविध मोहिमांचे आयोजन करणे हे उपक्रम या युवा पर्यटन मंडळांतर्गत अपेक्षित आहेत.
युवा पर्यटन मंडळ स्थापन करणेसाठी प्रोत्साहन स्वरूप अनुदान म्हणून सन 2023-23 या वित्तिय वर्षामध्ये शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी रू. 10,000/- व महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी रू. 25,000/- असा निधी प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वावर पर्यटन
संचानलयाकडे प्रस्ताव सादर करणा-या शाळा/महाविद्यालयांना वितरित करण्यात येईल.
युवा पर्यटन मंडळामध्ये 25 विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रत्येक शाळेतील शिक्षक मंडळाचे समन्वयक म्हणून काम पाहतील. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी साठी सर्व सहभागी विद्यार्थी सदस्यांचे आधार क्रमांक, शिक्षक व विद्यार्थी समन्वयकांचे आधार क्रमांक, मुख्याध्यापक / प्राचार्यांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव पाठविणे
आवश्यक आहे. युवा पर्यटन क्लब स्थापनेनंतर पर्यटन स्थळांना भेटी देण्याबाबत छायाचित्रांसह अहवाल
मुख्याध्यापक/ प्राचार्यांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.
नाशिक विभागातील सर्व संबंधित शाळा / महाविद्यालये यांनी युवा पर्यटन क्लब स्थापन करणेसाठी पर्यटन संचालनायामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहिती साठी संपर्क - उपसंचालक कार्यालय पर्यटन भवन, शासकीय विश्राम ग्रह आवार,
गोल्फ क्लब मैदान,नाशिक 422001 दु.क्र.(0253) - 2995464 / 2970049
ईमेल – ddtourism.nashik-mh@gov.in,website – www.maharashtratourism.gov.in

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा