मनोहर उर्फ संभाजी भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे मागणी !


मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) २.८.२०२३
     महाराष्ट्रात मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे भडकाऊ भाषण करीत असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एक सनातन संभाजी भिडे महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये निर्माण होईल असे भडकाऊ भाषणे करीत आहे. राष्ट्रीय ध्वज तिरंगा आणि राज्यघटनेबद्दल देशद्रोही वक्तव्य करीत आहे. काही दिवसांपूर्वी भिडे या इसमाने महात्मा गांधीबद्दल बदनामी करणारे वक्तव्य केले. संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांसारख्या महापुरुषांची बदनामी होईल अशी भाषणे केली परंतु त्यांच्यावर सरकारने कोणतेही कारवाई केली नाही त्यामुळे त्यांची हिम्मत वाढली. मनोहर भिडेची भाजपचे खासदार बोंडे हे समर्थन करीत आहे. भिडेला पाठिंबा देणारे त्यांचे समर्थन करणारे त्यांच्या मागील मास्टरमाईन शोधून भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोहर भिडेचा निषेध करण्यात आला.
    यावेळी ॲड. कॉ. सुधीर टोकेकर, जिल्हा सचिव ॲड. कॉ. बन्सी सातपुते, भारती न्यायपेल्ली, सगुना श्रीमल, संगीता कोंडा, अरुण थिटे, दीपक शिरसाट, शिवाजी साळवे, बाळकृष्ण जगताप, जयवंत बोरुडे, संजय मोडवे, जयवंत बोरुडे, शिवम यादव, संजय मोढवे, विनोद वारे आदींसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा