शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या मोदी सरकारच्या तातडीच्या प्रयत्नाबद्दल जाहीर आभार मानणारा फ्लेक्स बोर्ड होतोय व्हायरल


मख़दूम समाचार 
पारनेर (प्रतिनिधी) २३.८.२०२३
    तालुक्यातील जवळा येथे आळेफाटा रोडवर शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या मोदी सरकारच्या तातडीच्या प्रयत्नाबद्दल जाहीर आभार मानणारा फ्लेक्स बोर्ड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तालुक्यातच नव्हे तर राज्यभरातील शेतकरी बांधव सोशल मिडीया वापरणारे या जाहीर आभाराचे छायाचित्र व्हायरल करून सरकारचे आभार मानत असल्याचे दिसून येत आहे. पारनेर तालुक्यातील जवळा हा बागायती भाग असून येथे टोमॅटो आदी भाजीपाल्यासह कांद्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. परिसरातील शेतकरी प्रचंड मेहनती असल्याने ते आर्थिकदृष्ट्याही जागरूक आहेत. येथे शेती व्यवसायाशी निगडीत मोठी बाजारपेठ आहे. येथील भाजीपाला, फळफळाव पुणे, मुंबईसह राज्यातील विविध बाजारपेठेत जात असते.
    मोदी सरकार सध्या शेतकरीविरोधी कामकाजात ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे संयुक्त आंदोलन करून देशविरोधी, शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यास भाग पाडल्याने जगभरात या सरकारची मोठी छी: थू: झालेली होती. सरकारची प्रतिमा जगामधे मानवताविरोधी, शेतकरीविरोधी असल्याचे झालेली होती. ती सल सरकारच्या डोक्यात असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. आपला भारत कृषीप्रधान देश असूनही मोदी सरकार अनेक निर्णय कृसी व शेतकरीविरोधी घेत असल्याचे दिसते आहे.
   सरकारने काही दिवसांपूर्वी टॉमॅटो उत्पादक शेतकरी देशोधडीला लागावा असा निर्णय घेऊन भाव पाडल्याचे संपुर्ण देशाने पाहिले. त्याच पुन्हा कांदा उत्पादक शेतकरीविरोधी निर्णय घेतले गेल्याने देशभरातील शेतकरी समुह संतापात आलेला आहे.
     अहमदनगर जिल्हा पारनेर तालुक्यातील जवळा येथील शेतकऱ्यांनी आरएसएस बीजेपीच्या मोदी सरकारविरोधात आपली प्रतिक्रिया जाहीरपणे नोंदविली आहे. येथील आळेफाटा रोडवर सर्वांनी मिळून मोदी सरकारचे जाहीर आभार मानणारा फ्लेक्सबोर्ड लावून आपले म्हणणे कळविले आहे. या बोर्डवर डाव्या बाजूला वरच्या बाजूला प्रधानमंत्री मोदीचा फोटो डकवून खाली उजवीकडे कांद्याचा फोटो लावला आहे आणि त्यावर लिहले आहे की, 'टोमॅटोचे भाव पाडून झाल्यावर कांद्याचे भाव देखील पाडण्यासाठी केलेल्या तातडीच्या प्रयत्नाबद्दल मोदी सरकारचे तमाम शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार' 
'नवी हिटलरशाही - शेतकऱ्यांचे मरण'
    या फ्लेक्सबोर्डचे छायाचित्र संपुर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेतकरी संताप यातून मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. देशातील शेतकऱ्यांमधे चर्चा आहे की, कांद्यामुळे हे सरकार पडणार !

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा