अहमदनगर - जिल्हा परिषद संचलित आयडियल शाळांमधील शिक्षिका यास्मिन खान नासिर खान पठाण यांनी किसनराव डोंगरे बहुदेशी संस्था वतीने ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आमदार निलेश लंके, कवी संमेलन प्रा.डॉ. शंकर चव्हाण, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राजेंद्र उदागे, माधवराव लामखडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशेवरे, उपनिरीक्षक अश्विनी मोरे, संयोजक पै. नाना डोंगरे, सुनिल गोसावी, बाळासाहेब शहाणे, गोपाल चांदेकर, हेमंत उबाळे, सरपंच लताबाई फलके, मिराबक्ष शेख, नासिर खान आदी उपस्थित होते.
यास्मिन खान या गेल्या बावीस वर्षापासून ज्ञानदानाचे काम करत आहे. मुकुंदनगर येथील एसएमआय असीर संचलित आयडियल उर्दू शाळांमध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्यांनी या शाळांमध्ये चांगले विद्यार्थी घडवले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले कामाबद्दल त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अडचणी समजावून घेत, त्या सोडविणे. विद्यार्थ्यांना कृतीशिल शिक्षणाबरोबर आधुनिक शिक्षणाची ओळख करुन देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यांची कामाची दखल घेत संस्थाचे वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यास्मिन खान यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
Post a Comment