मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २१.९.२२३
मुस्लिम धर्माचे जगप्रसिद्ध सुफीसंत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने केजीएन चहा दुकानाचे मालक गुलामअली रहेमान शेख समक्ष कोतवाली पोलीस स्टेशनला हजर राहून फिर्याद दिली. फिर्यादीत त्यांनी सांगितले की, ओप्पो कंपनीचा एफ २१ मोबाईलफोन असुन त्यात जीओ कंपनीचे ७२४९८५६२२६ नंबरचे सीम आहे. काल ता. २० रोजी सायं.०७.०२ च्या सुमारास त्यांचे मित्र अजहर शेख यांनी त्यांना व्हॉटसअपवर दिलीप भळगट याने मोबाईल क्रं. ९४२१५५५५८१ यावरुन ईश्वर बोरा हे गृप ॲडमिन असलेल्या 'Ahmednagar Newspapers' नावाच्या व्हॉटसअपगृपवर ता. २० रोजी सायं ०६.३० वा सुमारास मुस्लिम धर्माचे संत मोईनुद्दीन चिस्ती यांच्याबद्दल चुकीची माहिती सांगणारा एनिमेटेड व्हीडीओ क्लिप पोस्ट केली. त्यात एक भगवे कपडे धारण केलेल्या एनिमेटेड वयोवृध्द पुरुष बोलतांना दिसत असून, त्या इसमाने हिंदी भाषेत अजमेरचे जगप्रसिद्ध सुफीसंत ख्वाजा मोहिद्दीन चिश्ती यांच्याबद्दल आपत्तीजनक असे व्हीडीओ व्दारे आवाजाने प्रसारीत करुन अजमेरची दर्गा ख्वाजा मोहिद्दीन चिश्ती यांच्याबद्दल चुकीचे व अपशब्द वापरुन निरनिराळया धर्मात व गटात शत्रुत्वाची भावना वाढेल किंवा एकोपा टिकण्यास बाधक होईल असे कृत्य करुन मुस्लिम समाजाचे धार्मिक श्रध्देचा बुध्दीपुरस्पर व दुष्ट उद्देशाने अपमान केला आहे. म्हणुन त्यांच्याविरुध्द फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्मिय लोक जमले होते. डॉ. परवेज अशरफी व इतरांनी न्यूज चॅनलला सविस्तर माहिती दिली.
Post a Comment