अहमदनगर - कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघ भारत तर्फे 2023 साठीचा नॅशनल लँग्वेज टीचर अवॉर्ड म्हणजेच राष्ट्रीय भाषा शिक्षा पुरस्कार मुनव्वर हुसेन छोटे खान यांना नुकताच जाहीर करण्यात आला.हा पुरस्कार संपूर्ण देशातील निवडक शिक्षकांना दिला जातो.
मुनव्वर हुसेन छोटे खान एम.ए (इंग्लिश) व बी.एड. असुन अहमदनगर उर्दू हायस्कूल, अहमदनगर (मिसगर लायब्रेरी) या शाळेत शिक्षक आहे. उर्दु, हिंदी, आणि इंग्रजी भाषेचे गाढे अभ्यासक असून या भाषांमध्ये ते साहित्य सृजन करतात. ते एक कुशल अणि तज्ज्ञ भाषांतरकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत.तसेच शिक्षक भारती उर्दू संघटना, अहमदनगरचे जिल्हा सेक्रेट्री व इदारा अदबे इस्लामी अहमदनगर (उर्दू साहित्य संघटना) चे सेक्रट्री आहे. व त्यांनी त्यांचे आजोबा हिम्मत अहमदनगरी यांचे पुस्तक "नुरुलहुदा" 2016 मध्ये प्रकाशित केले असुन अहमदनगर जिल्ह्यात विविध साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमात अग्रेसर असतात. स्वत: उर्दू कवी आहे. त्यांना गुफ्तगू साहित्यिक संस्था, प्रयागराज तर्फे आधुनिक भारताचे गज़लकारासोबत "फिराक गोरखपुरी सम्मान" 2022 मिळालेला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय भाषा
Post a Comment